नागपुरात ७४८५ नवे बाधित; आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 08:59 PM2021-04-23T20:59:25+5:302021-04-23T21:00:39+5:30

Coronavirus in Nagpur कोरोनाच्या संसर्गाची दाहकता कायम असून, शुक्रवारीदेखील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सात हजारांहून वर गेली. नागपूर जिल्ह्यात ७ हजार ४८५ नवे बाधित आढळले. हा आतापर्यंतच्या बाधितांचा सर्वांत जास्त आकडा आहे.

7485 newly affected in Nagpur; The highest figure ever | नागपुरात ७४८५ नवे बाधित; आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा

नागपुरात ७४८५ नवे बाधित; आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा

Next
ठळक मुद्दे ८२ रुग्णांचा मृत्यू २४ तासांत साडेसहा हजार बाधित कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या संसर्गाची दाहकता कायम असून, शुक्रवारीदेखील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सात हजारांहून वर गेली. जिल्ह्यात ७ हजार ४८५ नवे बाधित आढळले. हा आतापर्यंतच्या बाधितांचा सर्वांत जास्त आकडा आहे. २४ तासांत साडेसहा हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ८२ रुग्णांचा मृत्यू झाला.

शुक्रवारी जारी झालेल्या अहवालानुसार नागपूर शहरात ४ हजार ८७९ व ग्रामीणमध्ये २,५९८ रुग्ण आढळले. मृतांमध्ये ग्रामीणमधील २०, शहरातील ५४ व जिल्ह्याबाहेरील आठ जणांचा समावेश होता. बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये शहरातील ४ हजार ८७९ व ग्रामीण भागातील २ हजार ५९८ जणांचा समावेश आहे.

शुक्रवारी एकूण २४ हजार ५३३ चाचण्या झाल्या. यात आरटीपीसीआरच्या १६ हजार ८०४, तर ॲन्टिजनच्या ७ हजार ७२९ चाचण्यांचा समावेश आहे. ग्रामीणमध्ये ८ हजार ५४८, तर शहरात १५ हजार ९८५ चाचण्या झाल्या. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ५८ हजार ४१८ कोरोनाबाधित आढळले आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ६ हजार ७६७ झाली आहे. यात जिल्ह्याबाहेरील ९९१ रुग्णांचा समावेश आहे.

सुमारे ५७ हजार रुग्ण गृहविलगीकरणात

कोरोना झाल्यानंतर प्रत्येकच रुग्णाला दवाखान्यात भरती होण्याची गरज नसते. नागपूर जिल्ह्यात ५६ हजार ९४६ रुग्ण गृह विलगीकरणात असून, १६ हजार ४०३ रुग्ण विविध सरकारी व खासगी रुग्णालयांत दाखल आहेत.

७३ हजार ॲक्टिव्ह रुग्ण

सद्यस्थितीत नागपूर जिल्ह्यात ७३ हजार ३४९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यात शहरातील ४४ हजार ४४२ व ग्रामीणमधील २८ हजार ९०७ बाधितांचा समावेश आहे.

 

Web Title: 7485 newly affected in Nagpur; The highest figure ever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.