शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला; जाणून घ्या किती षटकांचा होणार सामना     
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

७४ किलोमीटर लांबीच्या वीजवाहिन्या लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 8:13 PM

उमरेड परिसरातील ग्रामीण भागात भुरट्या चोरांनी धुमाकूळ घालून महावितरणच्या वीजवाहिन्यांना लक्ष्य केले आहे. वर्षभराच्या कालावधीत चोरट्यांनी सुमारे ७४ किलोमीटर लांबीच्या वीजवाहिन्या लंपास केल्या आहेत. लंपास केलेल्या वीजवाहिन्यांची किंमत दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

ठळक मुद्देउमरेडमध्ये भुरट्या चोरांचा हैदोस : महावितरणला फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उमरेड परिसरातील ग्रामीण भागात भुरट्या चोरांनी धुमाकूळ घालून महावितरणच्या वीजवाहिन्यांना लक्ष्य केले आहे. वर्षभराच्या कालावधीत चोरट्यांनी सुमारे ७४ किलोमीटर लांबीच्या वीजवाहिन्या लंपास केल्या आहेत. लंपास केलेल्या वीजवाहिन्यांची किंमत दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. परिणामी, परिसरात अखंडित वीजपुरवठा करण्यास महावितरण प्रशासनास अडचणींचा सामना करावा लागतो आहे. या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याची विनंती महावितरणकडून उमरेड पोलिसांना करण्यात आली आहे.महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, वीजचोरांनी उमरेड शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागाकडे आपले लक्ष्य केंद्रित केले आहे. परिणामी, किन्हाळा, शिरपूर, मकरधोकडा, उकरवाही, हेटी, हातकवडा, पाहमी, चारगाव, कळमना, उदासा, सेलोटी, बोरादाखल, गौवसी, शेडेश्वर, ठोंबरा, कातगाव, गावसुत, बोर्डकला, वासी यासह एकूण २६ ठिकाणी चोरट्यांनी आपला कार्यभाग साधला आहे. महावितरणच्या उमरेड ग्रामीण शाखा कार्यालयाच्या हद्दीत येणाऱ्या या गावात चोरट्यांनी मे-२०१८ पासून चालू वीजवाहिन्यांवरील वीजप्रवाह बंद करून अ‍ॅल्युमिनियमच्या वाहिन्या लंपास केल्या आहेत.चालू वीजवाहिन्यांशी खेळणे हे जीवावर बेतू शकते, याची जाणीव असतानादेखील जीव धोक्यात घालून चोरटे आपला कार्यभाग साधत आहेत. चोरटे आपला कार्यभाग साधत असल्याने महावितरणला या भागात वीजपुरवठा करण्यास अडचणीचा सामना करावा लागतो आहे.चोरट्यांनी वीजवाहिन्या लंपास केल्यावर पुन्हा नवीन साहित्याची जमवाजमव करण्यात वेळ जातो आणि परिणामी बराच काळ वीज ग्राहकांना अंधारात राहावे लागते. प्रसंगी वीज ग्राहकांचा रोषही स्थानिक कर्मचाऱ्यांना पत्करावा लागतो.या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, या मागणीचे निवेदन महावितरणच्या उमरेड विभागाचे कार्यकारी अभियंता प्रफुल लांडे यांनी उमरेड पोलिसांना दिले आहे. दीड कोटी रुपयांची वीजवाहिनी चोरीला गेल्याने महावितरणला या भागात नवीन वीजवाहिनी टाकण्यासाठी पुन्हा तेवढ्याच किमतीची नवीन वीजवाहिनी टाकावी लागली आहे.उमरेड ग्रामीण भागातील निर्जनस्थळी वीजवाहिनीजवळ संशयास्पद हालचाली आढळून आल्यास, नागरिकांनी जवळच्या महावितरण कार्यालय किंवा पोलीस स्थानकास माहिती देण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणtheftचोरी