७३ हजारांचे साेन्याचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:12 IST2021-08-15T04:12:06+5:302021-08-15T04:12:06+5:30

नरखेड : चाेरट्याने घरफाेडी करीत कपाटातील ७३ हजार रुपये किमतीचे साेन्याचे दागिने चाेरून नेले. ही घटना नरखेड शहरात नुकतीच ...

73,000 Saenya jewelery or lamps | ७३ हजारांचे साेन्याचे दागिने लंपास

७३ हजारांचे साेन्याचे दागिने लंपास

नरखेड : चाेरट्याने घरफाेडी करीत कपाटातील ७३ हजार रुपये किमतीचे साेन्याचे दागिने चाेरून नेले. ही घटना नरखेड शहरात नुकतीच घडली असून, शुक्रवारी (दि. १३) सकाळी उघडकीस आली.

अरविंद माधवराव घाेडे (वय ६०, रा. मेटकर लेआऊट, नरखेड) हे कुटुंबीयांसह त्यांच्या मुलीकडे नागपूरला गेले हाेते. त्यामुळे घरी कुणीही नव्हते. त्यातच घरी कुणीही नसल्याचे पाहून चाेरट्याने दाराचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला व कपाटातील ७३ हजार रुपये किमतीचे साेन्याचे दागिने घेऊन पाेबारा केला. ते शुक्रवारी घरी परत आल्यावर चाेरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पाेलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी नरखेड पाेलिसांनी अज्ञात आराेपींविरुद्ध भादंवि ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सहायक फाैजदार राजू गजभिये करीत आहेत.

Web Title: 73,000 Saenya jewelery or lamps