७,२८३ चाचण्या, २६९० बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:10 IST2021-04-30T04:10:27+5:302021-04-30T04:10:27+5:30

सावनेर/काटोल/नरखेड/ कामठी/ उमरेड/ कळमेश्वर/ कुही/ हिंगणा: नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात लॉकडाऊनला अनेकांनी ठेंगा दाखविल्याने बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत ...

7,283 trials, 2690 infected | ७,२८३ चाचण्या, २६९० बाधित

७,२८३ चाचण्या, २६९० बाधित

सावनेर/काटोल/नरखेड/ कामठी/ उमरेड/ कळमेश्वर/ कुही/ हिंगणा: नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात लॉकडाऊनला अनेकांनी ठेंगा दाखविल्याने बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार जिल्ह्यातील तेरा तालुक्यात ७२८३ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत २६९० नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. ग्रामीण भागात ३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या १७८१ इतकी झाली आहे. बुधवारी २३५० रुग्णांनी कोरोनावर मात केली. ग्रामीण भागात सध्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३०,८३४ इतकी झाली आहे.

काटोल तालुक्यात ४४४ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ७३ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात शहरातील १९ तर ग्रामीण भागातीलही ५४ रुग्णांचा समावेश आहे.

नरखेड तालुक्यात १०० नवीन रुग्णांची भर पडली. यात शहरातील ४८ तर ग्रामीण भागातील ५२ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २४१९ तर शहरातील ५३३ इतकी झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव अंतर्गत येणाऱ्या गावात (१४), जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र (६), मेंढला (१७) तर मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या गावात १५ रुग्णांची नोंद झाली.

कुही तालुक्यातील विविध केंद्रांवर एकूण २९४ चाचण्या करण्यात आल्या. तीत केवळ आठ रुग्णांची नोंद झाली; मात्र दोन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या आरटीपीसीआर चाचणीचे अहवाल बुधवारी प्राप्त झाले. तीत ७९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या ३,३७९ इतकी झाली आहे. यातील २१०८ रुग्ण बरे झाले. सध्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १२७१ इतकी आहे.

कळमेश्वर तालुक्यात १६४ रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प.क्षेत्रातील २६ तर ग्रामीण भागातील १३८ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात मोहपा येथे २६, मांडवी (२०), कोहळी (१७) तर म्हसेपठार येथे १० रुग्णांची नोंद झाली.

उमरेड तालुक्यात ५७ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ३९ तर ग्रामीण भागातील १८ रुग्णांचा समावेश आहे. कामठी तालुक्यात ४७७ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ९७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

हिंगण्यात पुन्हा ११२ बाधित

हिंगणा तालुक्यात ५५३ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ११२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. वानाडोंगरी येथे ५५, टाकळघाट (२२), गुमगाव (७) तर कान्होलीबारा येथे ६ रुग्णांची नोंद झाली. तालुक्यातील बाधितांची संख्या १०२१२ इतकी झाली आहे. यातील ६७४६ रुग्ण बरे झाले आहे. बुधवारी १४ रुग्णांचा मृत्यू झाला. तालुक्यातील मृतांची संख्या २१३ इतकी झाली आहे.

Web Title: 7,283 trials, 2690 infected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.