सर्वांसाठी घरे योजनेंतर्गत नागपूर विभागात ७२,८१८ हजार घरे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 21:19 IST2021-06-17T21:17:53+5:302021-06-17T21:19:28+5:30
housing scheme for all महा आवास अभियान-ग्रामीण अभियानांतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना घरकूल देण्याच्या योजनेंतर्गत विभागात ७२ हजार ८१८ लाभार्थ्यांसाठीच्या घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

सर्वांसाठी घरे योजनेंतर्गत नागपूर विभागात ७२,८१८ हजार घरे पूर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महा आवास अभियान-ग्रामीण अभियानांतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना घरकूल देण्याच्या योजनेंतर्गत विभागात ७२ हजार ८१८ लाभार्थ्यांसाठीच्या घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तसेच १ लाख ३२ हजार ८७७ लाभार्थ्यांच्या घरांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे.
‘सर्वांसाठी घरे- २०२२’ या शासनाच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी नागपूर विभागात सुरू आहे. भूमिहीन लाभार्थ्यांना घरकूल बांधकामासाठी जागा उपलब्ध करून देणे, केंद्र पुरस्कृत व इतर राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत घरकूल मंजूर करणे, घरकूल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना निधी उपलब्ध करून देऊन घरकुलाचा प्रत्यक्ष ताबा देण्यासाठी या अभियानांतर्गत कालबद्ध कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. विभागात ग्रामीण भागातील कुटुंबांसाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत केंद्र व राज्य पुरस्कृत विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनेंची अंमलबजावणी सुरु आहे. सर्वांसाठी घरे -२०२२ हे अभियान २० नोव्हेंबर ते ५ जून या कालावधीत राबविण्यात आले होते.
नागपूर विभागात या अभियान काळात ७२,८१८ घरांचे बांधकाम भौतिकदृष्ट्या पूर्ण झाले आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यात १०,०२४, वर्धा ६,४४४, भंडारा ५४९३, गोंदिया ४३,४९७, चंद्रपूर ५७३१, तर गडचिरोली जिल्ह्यात २,६२९ पूर्ण झालेल्या घरांचा समावेश आहे. तसेच १ लाख ३२ हजार ८७७ लाभार्थ्यांच्या घरांचे बांधकाम प्रगतिपथावर असून यामध्ये नागपूर जिल्ह्यात ३५,१३४, वर्धा २७,२९४, भंडारा १४,०४५, गोंदिया २३,५५९, चंद्रपूर २२,९२२ तर गडचिरोली जिल्ह्यातील ९,८९३ घरांचा समावेश आहे.