७२ वर्षीय के.जी. मिसर यांना पत्रकारितेत पीएच.डी

By Admin | Updated: June 20, 2014 01:03 IST2014-06-20T01:03:41+5:302014-06-20T01:03:41+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विद्या विभागाचे माजी प्रमुख के.जी. मिसर यांना राजस्थान येथील जे.जे.टी विद्यापीठाने आचार्य पदवी (पीएच.डी) प्रदान केली आहे.

72 year old K.G. Egypt's Ph.D. in Journalism | ७२ वर्षीय के.जी. मिसर यांना पत्रकारितेत पीएच.डी

७२ वर्षीय के.जी. मिसर यांना पत्रकारितेत पीएच.डी

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विद्या विभागाचे माजी प्रमुख के.जी. मिसर यांना राजस्थान येथील जे.जे.टी विद्यापीठाने आचार्य पदवी (पीएच.डी) प्रदान केली आहे.
त्यांनी ‘महाराष्ट्रातील विशेष संदर्भासह पत्रकारितेचे बदलते स्वरूप’ या विषयावर आपला शोधप्रबंध सादर केला होता. नागपूर येथील सी.पी अ‍ॅण्ड बेरार महाविद्यालयात डॉ. मिसर इंग्रजीचे प्राध्यापक होते. नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाचे १० वर्षे प्रमुख होते. पत्रकारितेतील बारकाव्यांचे जाणकार असलेल्या मिसर यांनी आपला शोधप्रबंध डॉ. राजा पोख्रापूरकर यांच्या मार्गदर्शनात तीन वर्षांत पूर्ण केला. डॉ. हरिसिंग गौर सागर विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाच्या स्थापनेत डॉ. मिसर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांच्या आयोजनासह सहभाग नोंदविला. मिसर यांनी मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि नागपूर येथे ४०० वाचकांसमोर मुद्रित माध्यामांचे स्वरूप या विषयावर मार्गदर्शन केले आहे. डॉ. मिसर यांनी हृदय मित्र मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यांनी संस्थेच्या प्रगतीत भरीव कामगिरी केली. आजही ते अनेक संस्थांमध्ये सक्रिय भूमिका बजावत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 72 year old K.G. Egypt's Ph.D. in Journalism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.