7 positive in Yavatmal district; The number in Vidarbha has risen to 46 | Corona Virus in Nagpur; यवतमाळ जिल्ह्यात ७ पॉझिटिव्ह; विदर्भातील संख्या ४६ वर गेली

Corona Virus in Nagpur; यवतमाळ जिल्ह्यात ७ पॉझिटिव्ह; विदर्भातील संख्या ४६ वर गेली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: कोरोनाची तपासणी करण्यसाठी यवतमाळ जिल्ह्यातून आलेल्या १३ नमुन्यांमधून ७ जणांचे नमुने पॉझिटिव्ह असल्याचे धक्कादायक वृत्त आत्ताच हाती आले आहे.
मंगळवारी यवतमाळ जिल्ह्याून १३ नमुने नागपुरात तपासणी करिता आले होते. तसेच वाशिम जिल्ह्यातून ६ नमुने आले होते. यातील यवतमाळच्या नमुन्यामधून ७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे तर वाशिममधील नमुन्यांमधून १  जण कोरोनाबाधित असल्याचे तपासणी अहवालात स्पष्ट झाले आहे.
बुधवारी वाढलेल्या या आकडेवारीमुळे आता विदर्भात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४६ वर गेली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी

नागपूर-१८
बुलडाणा-११
गोंदिया-१
चंद्रपूर-१
अमरावती-४
वाशिम-१
यवतमाळ-८
अकोला-२

Web Title: 7 positive in Yavatmal district; The number in Vidarbha has risen to 46

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.