शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

वायू प्रदूषणामुळे ७० लाख लोकांचा मृत्यू; नागपुरातील खराब हवेच्या गुणवत्तेमुळे आरोग्यावर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 18:23 IST

डॉ. सुशांत मेश्राम: धूम्रपान फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जगभरात, इतर कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूच्या फुफ्फुसाच्या तुलनेत कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. जागतिकस्तरावर ५ पैकी १ मृत्यूसाठी डॉ. सुशांत मेश्राम फुफ्फुसाचे आजार कारणीभूत ठरतात. वायू प्रदूषणामुळे दरवर्षी अंदाजे ७ दशलक्ष अकाली मृत्यू होतात. धूम्रपान हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण आहे, जे जवळजवळ ८५ टक्के प्रकरणांसाठी जबाबदार आहे, अशी माहिती मेडिकलच्या पल्मोनरी, क्रिटिकल आणि स्लीप मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांनी दिली.

२५ सप्टेंबर हा दिवस जागतिक फुफ्फुस दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्ताने आयोजित पत्रपरिषदेत डॉ. मेश्राम यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, दमा, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी), फुफ्फुसाचा कर्करोग आणि क्षयरोग यांसारख्या दीर्घकालीन श्वासोच्छवासाच्या स्थितीमुळे जगभरातील लाखो लोक प्रभावित होत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार श्वसनाचे आजार हे जागतिकस्तरावर मृत्यू आणि अपंगत्वाच्या प्रमुख कारणांपैकी एक ठरले आहेत. 

सार्वजनिक आरोग्यावर परिणाम नागपुरातील खराब हवेच्या गुणवत्तेमुळे आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. अभ्यास दर्शविते की दमा, सीओपीडी, फुफ्फुसाचा कर्करोगासह श्वसनाचे आजार अधिक सामान्य होत आहेत. विशेषतः मुले आणि वृद्धांसारख्या असुरक्षित गटांमध्ये. कणीक पदार्थ (पीएम२.५ आणि पीएम१०) फुफ्फुसांमध्ये खोलवर प्रवेश करू शकतात, ज्यामुळे दीर्घकालीन आरोग्य समस्येचा धोका निर्माण झाला आहे.

हिवाळ्याच्या हंगामात हवेची गुणवत्ता खराब ! नागपुरातील 'एअर क्वालिटी इंडेक्स'च्या पातळीत अनेकदा चढ-उतार होत असतात, शहरामध्ये विशेषतः हिवाळ्यात हवेची गुणवत्ता खराब ते मध्यम असते. ज्यामुळे श्वसन आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांची जोखीम निर्माण होते. नागपूरचा अलीकडील हवा गुणवत्ता निर्देशांक ७४ आहे, जो जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेल्या मर्यादपेक्षा १.५ पट जास्त आहे.

वायू प्रदूषणाच्या समस्येने नागपूर ग्रासले डॉ. मेश्राम म्हणाले, शहरीकरण, वाहनांची रहदारी आणि औद्योगिक क्रियाकलापांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याने नागपुरातील हवेच्या गुणवत्तेचा हास होत आहे. परिणामी नागपूर वायू प्रदूषणाच्या समस्येने ग्रासले आहे. वायू प्रदूषणाचे प्रमुख स्रोतामध्ये वाहनांचे उत्सर्जन, औद्योगिक प्रदूषण, बांधकाम, बायोमास आणि घनकचरा जाळणे व हंगामी पीक जाळणे आदी आहे.

टॅग्स :nagpurनागपूरHealth Tipsहेल्थ टिप्स