चार दिवसांच्या महोत्सवात ६६ लाखांची उलाढाल
By गणेश हुड | Updated: May 23, 2024 17:07 IST2024-05-23T17:06:36+5:302024-05-23T17:07:00+5:30
Nagpur : कृषि पणन मंडळातर्फे नागपुरात प्रथमच आयोजन

66 lakhs turnover during the four-day festival
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळातर्फे नागपुर शहरामध्ये प्रथमच आंबा, मिलेट व धान्य असा एकत्रीत महोत्सव १६ ते १९ मे दरम्यान आयोजित करण्यात आला. या चार दिवसांच्या कालावधीत ६६ लाखांची उलाढाल झाल्याची माहिती कृषी पणन मंडळाचे विभागीय उपसरव्यवस्थापक अजय कडू यांनी दिली.
या महोत्सवाला ९ हजार लोकांनी भेट दिली. ४० लाखाचे आंबे आणि २६ लाखाचे धान्य, मिलेट व प्रक्रियायुक्त पदार्थांची विक्री झाली. उत्पादकांना ५७ स्टॉल उपलब्ध करण्यात आले होते. महोत्सवामध्ये वैयक्तिक उत्पादक, शेतकरी बचत गट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्टअप कंपन्या यांचा समावेश होता. त्यामूळे सदर उत्पादकांच्या उत्पादनांची प्रचार प्रसिध्दी, ग्राहकांमध्ये जागरुकता, थेट खरेदी व मार्केट-लिकेजेस तयार करणे आवश्यक होते. महोत्सवामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यातील हापूस तसेच राज्यातील इतर भागातील केशर, लंगडा आंबा उत्पादकांचा सामावेश होता.. तसेच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मिलेट व धान्य उत्पादक सदर महोत्सवात त्याच्या शेतमालाची कोणत्याही मध्यस्थाविना थेट ग्राहकांना विक्री करण्यात आल्याची माहिती अजय कडू यांनी दिली.