६१ तरुणांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:26 IST2020-12-15T04:26:38+5:302020-12-15T04:26:38+5:30
रामटेक : स्थानिक पाेलीस ठाण्याच्या आवारात रक्तदान शिबराचे नुकतेच आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात पाेलीस कर्मचाऱ्यांसह ६१ तरुणांनी रक्तदान ...

६१ तरुणांनी केले रक्तदान
रामटेक : स्थानिक पाेलीस ठाण्याच्या आवारात रक्तदान शिबराचे नुकतेच आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात पाेलीस कर्मचाऱ्यांसह ६१ तरुणांनी रक्तदान केले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी जागेंद्र कट्यारे, उपविभागीय पाेलीस अधिकारी नयन आलूरकर, तहसीलदार बाळासाहेब मस्के, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, सहायक पाेलीस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे, उपनिरीक्षक अतुल कावडे, प्रमाेद राऊत, निशा भुते, शिवाजी बाेरकर उपस्थित हाेते. या शिबरात रामटेक पाेलीस ठाण्यातील पाेलीस कर्मचाऱ्यांसह शहरातील सामाजिक संघटनांमध्ये कार्यरत असलेल्या ६१ तरुणांनी रक्तदान केले. या शिबिराचे आयाेजन काेराेना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले हाेते, अशी माहिती पाेलीस निरीक्षक प्रमाेद मकेश्वर यांनी दिली. रक्त संकलनाची जबाबदारी नागपूर येथील डागा स्मृती शासकीय रुग्णालयातील डॉ. रवींद्र पांडे, नंदा राऊत, आरती कांबळे, वर्षा बालपांडे व चमूने पार पाडली. यशस्वितेसाठी पाेलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.