शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आयबीपीएस-एलआयसी अधिकारी पदासाठी मोफत प्रशिक्षणासह दरमाह ६ हजार विद्यावेतन

By आनंद डेकाटे | Updated: August 23, 2023 16:28 IST

महाज्योती : २१ सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज

नागपूर : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या‎ संस्थेमार्फत यंदा इन्स्टिट्यूशन ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनच्या (आयबीपीएस) प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) तसेच भारतीय जीवन बीमा निगम (एलआयसी)तर्फे असिस्टंट अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (एएओ) या पदासाठी महाज्योतीमार्फत नागपूर व छत्रपती संभाजी नगर या‎ दोन शहरात एकूण ६०० विद्यार्थ्यांना मोफत अनिवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना येत्या २१ स्पटेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. विशेष म्हणजे ६ महिने होणाऱ्या या प्रशिक्षणासाठी महाज्योतीतर्फे निवड झालेल्या विद्यार्थी ज्यांची हजेरी ७५ टक्के असणार अश्याना दरमाह ६ हजार रूपए विद्यावेतन संस्थेमार्फत देण्यात येणार आहे. अशी माहिती महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी दिली.

महाज्योती या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीयकृत बॅंक आणि एलआयसीच्या होणाऱ्या अधिकारी पदांच्या परीक्षेत यश प्राप्त करण्यासाठी सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे. या प्रशिक्षणाचा‎ लाभ घेण्यासाठी उमेदवार हा इतर मागास‎ वर्ग विमुक्त जाती-भटक्या जमाती व‎ विशेष मागास प्रवर्गापैकी असावा.‎ तसेच उमेदवार हा नाॅन क्रिमीलेअर उत्पन्न गटातील असावे. जे विद्यार्थी हे पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या किंवा पदवीच्या अंतिम वर्षाला असणारे विद्यार्थी सुद्धा या प्रशिक्षणकरिता ऑनलाईन अर्ज करू शकतात. उपरोक्त होणाऱ्या प्रशिक्षणाकरिता 30 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित आहे. तसेच अनाथांसाठी १ टक्के जागा आरक्षित करण्यात आली आहे. या प्रशिक्षणची वयोमर्यादा ही २० ते ३३ राहील.

- अधिक माहितीसाठी कॉल सेंटरची सुविधा

अर्ज भरतांना विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये म्हणून महाज्योतीतर्फे कॉल सेंटरची सुविधा सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी ०७१२-२८७०१२०-२१ या संपर्क क्रमांकावर किंवा इमेल आईडी: महाज्योतीनीट२४ /जिमेल.कॉम वर आपल्या अर्जातील साशंकता दुरू करता येणार.

टॅग्स :Educationशिक्षणnagpurनागपूर