जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी ६ लाख मतदार बजावतील मतदानाचा हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2021 15:52 IST2021-10-03T15:49:15+5:302021-10-03T15:52:23+5:30
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ७९ व पं.स. साठी १२५ उमेदवार रिंगणात आहे. तर, २ लाख ९६ हजार ७२१ महिला मतदार व ३ लाख १९ हजार २९२ पुरुष मतदार असे एकूण ६ लाख १६ हजार १६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी ६ लाख मतदार बजावतील मतदानाचा हक्क
नागपूर : १६ जिल्हा परिषद व ३१ पंचायत समितीच्या पोट निवडणुकीचे मतदान येत्या ५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या निवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी ७९ व पं.स. साठी १२५ उमेदवार रिंगणात आहे.
या निवडणुकीत २ लाख ९६ हजार ७२१ महिला मतदार व ३ लाख १९ हजार २९२ पुरुष मतदार असे एकूण ६ लाख १६ हजार १६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. १११५ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. ५ ऑक्टोबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान पार पडणार आहे. त्यानंतर बुधवार ६ ऑक्टोबर रोजी मतमोजणी सकाळी १० वाजतापासून सुरू होईल. या पोट निवडणुकीकरिता विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषद भंडाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
दरम्यान रविवार प्रचाराचा सुपर संडे ठरल्याने उमेदवारांनी सकाळपासूनच प्रचाराला सुरुवात केली असून आज, रात्री १० वाजता प्रचार संपणार आहे. सुटीचा दिवस आल्याने अधिकाधिक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी नेते व कार्यकर्त्यांचे प्रयत्न आहेत. त्यासाठी सकाळपासून संपूर्ण सर्कल पिंजून काढण्याची व्यूहरचना आखण्यात आली आहे.