५६ हजारांचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:08 IST2021-02-15T04:08:50+5:302021-02-15T04:08:50+5:30

खापरखेडा : अज्ञात आराेपीने घरफाेडी करीत साेने-चांदीचे दागिने, राेख रक्कम व जुन्या वापरातील साड्या असा एकूण ५६ हजार ८४० ...

56,000 jewelery lamps | ५६ हजारांचे दागिने लंपास

५६ हजारांचे दागिने लंपास

खापरखेडा : अज्ञात आराेपीने घरफाेडी करीत साेने-चांदीचे दागिने, राेख रक्कम व जुन्या वापरातील साड्या असा एकूण ५६ हजार ८४० रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना खापरखेडा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव (रंगारी) येथे शनिवारी (दि.१३) उघडकीस आली.

सुभाष रामप्रवेश सिंग (५२, रा. वाॅर्ड क्र. ४, दहेगाव रंगारी, ता. सावनेर) हे २८ डिसेंबर २०२० पासून घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले हाेते. दरम्यान, अज्ञात चाेरट्याने घराच्या दाराचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. यात चाेरट्याने घरातील कपाटात लाॅकरमध्ये ठेवलेले ५६ हजार रुपये किमतीचे साेने-चांदीचे दागिने, राेख ३४० रुपये व जुन्या वापरातील चार साड्या असा एकूण ५६,८४० रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. शनिवारी (दि.१३) सुभाष सिंग घरी आले असता, त्यांना घरात चाेरी झाल्याचे आढळून आले. लागलीच त्यांनी पाेलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीचा शाेध सुरू केला आहे. पुढील तपास पाेलीस हवालदार उमेश ठाकरे करीत आहेत.

Web Title: 56,000 jewelery lamps