५५३ सापळे अन् ७५४ आरोपी
By Admin | Updated: July 2, 2014 00:51 IST2014-07-02T00:51:16+5:302014-07-02T00:51:16+5:30
राज्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (अॅन्टी करप्शन) वर्षभरात सरासरी जेवढे सापळे यशस्वी करतो तितके यावर्षी अवघ्या सहाच महिन्यात पूर्ण झाले आहेत. पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या धडक

५५३ सापळे अन् ७५४ आरोपी
अॅन्टी करप्शन : वर्षभराची कामगिरी अवघ्या सहा महिन्यात पूर्ण
राजेश निस्ताने - यवतमाळ
राज्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (अॅन्टी करप्शन) वर्षभरात सरासरी जेवढे सापळे यशस्वी करतो तितके यावर्षी अवघ्या सहाच महिन्यात पूर्ण झाले आहेत. पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या धडक मोहिमेचा हा परिणाम मानला जात आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागात प्रवीण दीक्षित हे महासंचालक म्हणून आॅक्टोबर २०१३ ला रुजू झाले. तेव्हापासून राज्यभर या विभागाच्या कामाची गती प्रचंड वाढली आहे. कामाच्या पद्धतींमध्येही पारदर्शकपणा आला असून सुधारणाही झाली आहे. हा विभाग पूर्वी वर्षभरात सरासरी पाचशेच्यावर सापळे यशस्वी करीत होता. आतापर्यंत ५८३ यशस्वी सापळे ही या विभागाची वर्षभरातील सर्वोच्च कामगिरी ठरली आहे.
दीक्षितांच्या कामाची वेगळी पद्धती आणि जिल्हा युनीटला दिलेल्या स्वातंत्र्याचा हा परिणाम मानला जात आहे. राज्यात दरदिवशी कुठे ना कुठे लाचखोराला पकडले जात आहे. आतापर्यंत तलाठी, ग्रामसेवक, शिपाई, कृषी सहायक, आरोग्य सहायक अशा कनिष्ठ कर्मचाऱ्यांवरच सापळा यशस्वी करून वार्षिक टार्गेट पूर्ण केले जात होते. परंतु आता मोठे अधिकारीही जाळ्यात अडकू लागले आहेत.