श्री गणेशाला उद्या अर्पण होणार ५५१ किलोचा केक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:08 IST2021-02-14T04:08:38+5:302021-02-14T04:08:38+5:30

नागपूर : नागपूर शहरातील पहिल्या क्रमांकाचे वृत्तपत्र लोकमत समाचार आणि श्री सिद्धिविनायक चॅरिटेबल ट्रस्ट महालच्यावतीने दरवर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा ...

A 551 kg cake will be offered to Shri Ganesha tomorrow | श्री गणेशाला उद्या अर्पण होणार ५५१ किलोचा केक

श्री गणेशाला उद्या अर्पण होणार ५५१ किलोचा केक

नागपूर : नागपूर शहरातील पहिल्या क्रमांकाचे वृत्तपत्र लोकमत समाचार आणि श्री सिद्धिविनायक चॅरिटेबल ट्रस्ट महालच्यावतीने दरवर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा गणेश जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. १५ फेब्रुवारीला या निमित्त श्री गणेशाला ५५१ किलो बुंदीचा केक अर्पण करण्यात येणार आहे. भाविक केक अर्पण करून जयंती उत्सव साजरा करणार आहेत. सायंकाळी ६ वाजता विघ्नहर्त्याची महाआरती करण्यात येईल. त्यानंतर केक कापून भाविकांना वितरित करण्यात येईल. १४ फेब्रुवारीपासून केक तयार करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. यात बुंदीसोबत मेवा आणि मिष्ठान्न टाकण्यात येतील. गणेश जयंतीला धार्मिक अनुष्ठानासाठी दिलीपभाई पोपट, अशोक गुप्ता, अतुल नाईक, दिवाकर दुर्णे, लखमीचंद हर्दवाणी, गोविंद जायसवाल, शैलेंद्र जायसवाल, अजय कमनानी, दिनेश जैस, राहुल धोपटे, बाळकृष्ण, दुर्गेश चौबे प्रयत्न करीत आहेत.

.........

श्रींचा होणार दुग्धाभिषेक

गणेश जयंतीनिमित्त सकाळी ६ वाजता मंदिर पट उघडल्यानंतर विघ्नहर्त्याचा दुग्धाभिषेक करण्यात येईल. आरती सोबत अथर्वशीर्षचा पाठ करण्यात येईल. दिवसभर भाविक दर्शनासाठी येणार आहेत. प्रितम बत्रा आणि सहकाऱ्यांच्या वतीने सायंकाळी संगीतमय महाआरती करण्यात येईल. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल. श्री सिद्धिविनायक मंदिरात विशेष सजावट करण्यात येत असून मंदिर परिसर फुगे आणि चॉकलेटने सजविण्यात येत आहे.

...............

Web Title: A 551 kg cake will be offered to Shri Ganesha tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.