रासायनिक खताच्या किमतीमध्ये ५० टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:08 IST2021-04-09T04:08:58+5:302021-04-09T04:08:58+5:30

नागपूर : मागील महिन्यात झालेला अवकाळी पाऊस, नापिकीच्या दुष्टचक्रात अडकलेला शेतकरी पुन्हा रासायनिक खताच्या किमतीमुळे वाकला आहे. खताच्या किमतीमध्ये ...

50% increase in chemical fertilizer prices | रासायनिक खताच्या किमतीमध्ये ५० टक्क्यांनी वाढ

रासायनिक खताच्या किमतीमध्ये ५० टक्क्यांनी वाढ

नागपूर : मागील महिन्यात झालेला अवकाळी पाऊस, नापिकीच्या दुष्टचक्रात अडकलेला शेतकरी पुन्हा रासायनिक खताच्या किमतीमुळे वाकला आहे. खताच्या किमतीमध्ये जवळपास ५० टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांची कंबर मोडण्याची पाळी आली आहे.

मागील महिन्यामध्ये खताच्या किमती वाढल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा इंडियन फार्मस फर्टिलायझर को-ऑप. लिमिटेडने नव्या दरांची घोषणा केली आहे. महिनाभराच्या आणि आताच्या नव्या दरांमध्येही तफावत दिसत असून, ही दरवाढ जवळपास ५० टक्क्यांवर गेली आहे. यामुळे शेती करणे आता आवाक्याबाहेरचे होणार आहे.

डीएपीचा दर प्रति मेट्रिक टन ३८ हजार रुपयावर गेला आहे. यात ५० किलोच्या एका बॅगमागे जवळपास ७०० रुपयांनी वाढ होऊन ही किंमत १,९०० रुपयांवर गेली आहे. जवळपास सर्वच खतांच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. यामुळे शेतीचा खर्चही वाढणार आहे. आधीच संकटात असलेला शेतकरी आता महागाईतही होरपळणार, असेच दिसत आहे.

...

असे वाढले दर

खत : पूर्वीची किंमत : महिनाभरापूर्वीची किंमत : आताची किंमत

डीएपी : १२०० : १४५० : १९००

एपीएस २०-२०-०-१३ : ९५० : ११२५ : १३५०

एनपीके १२-३२-१६ : ११८५ : १३७५ : १८००

...

Web Title: 50% increase in chemical fertilizer prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.