शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मानवी चाचणीसाठी ५० कोरोना वॉरिअर्स सज्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 20:14 IST

कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीच्या मानवी चाचणीसाठी नागपुरातील एका खासगी हॉस्पिटलची निवड झाल्यानंतर चाचणीसाठी आतापर्यंत ५० लोकांनी इच्छा व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देया आठवड्यात तपासणी पुढील आठवड्यापासून कोव्हॅक्सिनच्या चाचणीला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीच्या मानवी चाचणीसाठी नागपुरातील एका खासगी हॉस्पिटलची निवड झाल्यानंतर चाचणीसाठी आतापर्यंत ५० लोकांनी इच्छा व्यक्त केली आहे. धोका पत्करून कोरोनाला हरविण्यासाठी हे योद्धे समोर आले आहेत. या आठवड्यात त्यांची तपासणी करून त्यांच्या रक्ताचे नमुने मुंबईच्या प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत. योग्य अहवाल असणाऱ्या वॉरिअर्सवर पुढील आठवड्यापासून कोव्हॅक्सिनच्या चाचणीला सुरुवात होणार आहे.भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीच्या मानवी चाचणीसाठी देशात १२ सेंटरची निवड करण्यात आली आहे. यात नागपूरचे डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा समावेश आहे. या मानवी चाचणीसाठी अनेकांनी इच्छा व्यक्त केली. यातील १८ ते ५५ वयोगटातील ५० व्यक्तींची हॉस्पिटलने नोंदणी केली आहे. हॉस्पिटलचे संचालक डॉ. गिल्लूरकर यांनी सांगितले, १०-१० व्यक्तींचे पाच गट तयार करण्यात आले आहेत. याच आठवड्यात त्यांची शारीरिक तपासणी केली जाईल. यात त्यांना २९ निकषांतून जावे लागणार आहे. यात संबंधित व्यक्तीला दारूचे व्यसन नको, स्टेरॉईड घेणारा नको, लठ्ठपणा नको, कोविड रुग्णाच्या संपर्कातील नको, यकृत, मूत्रपिंड, हृदयाचा कुठलाही आजार नको, मधुमेह, एचआयव्हीचा संसर्ग, कॅन्सरचा रुग्ण नको आदी सर्व निकषांतून गेल्यावर त्यांची लेखी मंजुरी घेतली जाईल. त्यानंतर त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन मुंबईच्या प्रयोगशाळेत पाठविले जातील. रक्ताची चाचणी समाधानकारक असल्यावरच मानवी चाचणीसाठी निवड केली जाईल. निवड झालेल्यांवर पुढील आठवड्यापासून चाचणीला सुरुवात होईल, असेही डॉ. गिल्लुरकर म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल