रविभवनातील पीडब्ल्यूडीचे ५ कर्मचारी पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 20:43 IST2020-09-07T20:40:30+5:302020-09-07T20:43:02+5:30
रविभवन शासकीय विश्रामगृहात कार्यरत सार्वजनिक बांधकाम विभागातील ६ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यातील चार कर्मचारी येथे कार्यरत असलेल्या एजन्सीशी जुळलेले आहेत.

रविभवनातील पीडब्ल्यूडीचे ५ कर्मचारी पॉझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रविभवन शासकीय विश्रामगृहात कार्यरत सार्वजनिक बांधकाम विभागातील ६ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यातील चार कर्मचारी येथे कार्यरत असलेल्या एजन्सीशी जुळलेले आहेत.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एप्रिलमध्ये रविभवनात क्वारंटाईन सेंटर तयार करण्यात आले होते. नंतर हे सेंटर बंद करून येथे रुग्णांच्या सेवेत असलेल्या डॉक्टरांच्या निवासाची व्यवस्था करून कोविड टेस्टिंग सेंटर सुरू करण्यात आले. रविवारी रविभवनात कार्यरत पाच कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले. खबरदारी म्हणून रविभवनाच्या आत असलेले स्वागत कक्ष नव्या जागेत स्थानांतरित करून ती जागा सॅनिटाईझ करण्यात आली. आता स्वागत कक्ष इमारत क्रमांक -२ मध्ये स्थापन करण्यात आला आहे.