शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

नागपुरातील रस्त्यांसाठी ४८२.३८ कोटींची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 9:47 PM

स्थायी समितीच्या प्रस्तावित अर्थसंकल्पात शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण, दुरुस्ती व सिमेंट रोडसाठी विविध शीर्षकाखाली ४८२.३८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यात शहरातील आयआरडीपी रोड, मुख्य रस्त्यांची दुरुस्ती, दीनदयाल उपाध्यायअंतर्गत रस्ते सुधार कार्यक्रम, शहरातील नवीन रस्ते यासाठी १०२.३८ कोटी, सिमेंट काँक्रिट रोडसाठी ३०० कोटी, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत सिमेंट काँक्रिटच्या रोडसाठी ८० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देअर्थसंकल्पात उत्तर नागपूरला झुकते माप : जुनी कामे पूर्ण करण्यावर भर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्थायी समितीच्या प्रस्तावित अर्थसंकल्पात शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण, दुरुस्ती व सिमेंट रोडसाठी विविध शीर्षकाखाली ४८२.३८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यात शहरातील आयआरडीपी रोड, मुख्य रस्त्यांची दुरुस्ती, दीनदयाल उपाध्यायअंतर्गत रस्ते सुधार कार्यक्रम, शहरातील नवीन रस्ते यासाठी १०२.३८ कोटी, सिमेंट काँक्रिट रोडसाठी ३०० कोटी, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत सिमेंट काँक्रिटच्या रोडसाठी ८० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.शहरातील रस्त्यासोबतच उत्तर नागपुरातील विकास कामांना झुकते माप देण्यात आले आहे. यात उत्तर व पश्चिम नागपूरला जोडणारा इटारसी रेल्वे पुलाचा विस्तारित प्रकल्प, उत्तर व दक्षिण नागपूरला जोडणाऱ्या पाचपावली उड्डाणपुलाची दुरुस्ती, कमाल चौक ते अशोक चौकाला जोडणाऱ्या प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामाला या वर्षात सुरुवात केली जाणार आहे. कमाल चौक बाजारात व्यापारी भवन उभारण्याचे प्रस्तावित आहे.१२ कोटीचा बॅचमिक्स प्लान्टमहापालिका नवीन बॅचमिक्स प्लान्ट या वर्षात उभारणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात १२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सध्याचा हॉटमिक्स शहरासाठी सक्षम नाही.भूमिगत नाली व नाल्याचे कामपावसाळी नाल्या, भूमिगत नाल्या व सिवरेज लाईनसाठी अर्थसंकल्पात ३१.५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे तर नाल्यांच्या सुरक्षा भिंतीसाठी १२ कोटींचा खर्च प्रस्तावित आहे.महापुरुषांचे पुतळे उभारणारमहापुरुषांचे पुतळे उभारण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे कठोर नियम आहेत. असे असूनही शहरात महापुरुषांचे पुतळे उभारण्यासाठी अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली आहे. तसेच जुन्या पुतळ्यांच्या ठिकाणी असलेल्या शिलालेखावर त्यांचा संक्षिप्त जीवन परिचय दिला जाणार आहे.टाऊन हॉलसाठी १० कोटीमहाल येथील श्री राजे रघुजी भोसले नगर भवन(टाऊ न हॉल)च्या पुनर्विकासासाठी १० कोटींची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. मागील काही वर्षांपासून हा प्रकल्प प्रलंबित आहे.सहभागातून बाजार विकासकेळीबाग रोड येथील बुधवार बाजार, सक्करदरा बुधवार बाजार, बाभुळखेडा येथील रामेश्वरी बाजार, कमाल चौक येथील आठवडी बाजार आदी बाजारांचा लोकसहभागातून विकास केला जाणार आहे.राम सुमेरबाबा श्वान निवारा केंद्रशहरातील मोकाट कुत्र्यांच्या संख्येला आळा बसावा, त्यांची देखभाल करण्यासाठी परमहंस राम सुमेरबाबा श्वान निवारा केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात तीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBudgetअर्थसंकल्प