नागपूर जिल्ह्यात वर्षभरात ४७ शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 12:33 AM2019-12-28T00:33:59+5:302019-12-28T00:34:59+5:30

वर्ष २०१९ मध्ये एकट्या नागपूर जिल्ह्यात ४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. यातील २० आत्महत्या या मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले.

47 farmers commit suicide during the year in Nagpur district | नागपूर जिल्ह्यात वर्षभरात ४७ शेतकऱ्यांची आत्महत्या

नागपूर जिल्ह्यात वर्षभरात ४७ शेतकऱ्यांची आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्दे२० आत्महत्या मदतीसाठी पात्र 

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतकऱ्यांचे उत्पन्नात वाढविण्यासोबत शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून विविध योजना, उपक्रम राबविण्यात येत आहे. कर्जमाफीही देण्यात आली. त्यानंंतरही शेतकरी आत्महत्या होत आहे. वर्ष २०१९ मध्ये एकट्या नागपूर जिल्ह्यात ४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. यातील २० आत्महत्या या मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले.
शेतकरी आत्महत्या हा राज्याला आणि त्यातही विदर्भाला लागलेला कलंक समजण्यात येतो. हा कलंक पुसण्यासाठी आतापर्यंत शासनाकडून अनेक उपययोजना करण्यात आल्या. परंतु या योजनांचा किती फायदा होतो, हा प्रश्नच आहे. कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेचाही फारसा होत असल्याचे दिसत नाही. कर्जमाफीनंतर जवळपास सव्वाशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यातील ४४ आत्महत्या या मदतीस पात्र ठरविण्यात आल्या. वर्ष २०१९ मध्ये ४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यातील २० शेतकऱ्यांना मदत देण्यात आली. तर ९ प्रकरण प्रलंबित असून १८ प्रकरण मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आले.

 मदत निधी वाढीची घोषणा, अंमलबजावणी कधी
मदतीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे एक लाख रुपये देण्यात येते. तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी शेतकरी आत्महत्या मदतीची रक्कम पाच लाख रुपये करण्याची घोषणा सभागृहात केली होती. मात्र चार वर्ष होत असताना अद्याप त्यात वाढ करण्यात आली नाही, ही घोषणा प्रत्यक्षात कधी अंमलात येणार हाही प्रश्नच आहे.

Web Title: 47 farmers commit suicide during the year in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.