शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पावर ४५०० कोटींचा खर्च 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 21:26 IST

मेट्रो रेल्वेच्या नागपूर प्रकल्पाचे एकूण बांधकाम ७० टक्के पूर्ण झाले आहे. रिच-१ मध्ये मिहान डेपो ते सीताबर्डी मुंजे चौक १२ कि़मी. आणि रिच-२ मध्ये लोकमान्यनगर ते मुंजे चौक १२ कि़मी. अशा एकूण २४ कि.मी मार्गावर मेट्रो रेल्वे मार्च-२०१९ पर्यंत धावणार आहे. दोन्ही मार्गावर ९ स्टेशन राहतील. ८६८० कोटींच्या प्रकल्पांपैकी आतापर्यंत ४५०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. रिच-१ मध्ये २७३६ व्या अखेरच्या सेगमेंटचे काम पूर्ण होणार असून उद्घाटन शुक्रवारी वर्धा रोडवरील जामठा कास्टिंग यार्डमध्ये महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देरिच-१ करिता २७३६ वा अखेरचा सेगमेंट : मेट्रो २०१९ पर्यंत धावणार

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : मेट्रो रेल्वेच्या नागपूर प्रकल्पाचे एकूण बांधकाम ७० टक्के पूर्ण झाले आहे. रिच-१ मध्ये मिहान डेपो ते सीताबर्डी मुंजे चौक १२ कि़मी. आणि रिच-२ मध्ये लोकमान्यनगर ते मुंजे चौक १२ कि़मी. अशा एकूण २४ कि.मी मार्गावर मेट्रो रेल्वे मार्च-२०१९ पर्यंत धावणार आहे. दोन्ही मार्गावर ९ स्टेशन राहतील. ८६८० कोटींच्या प्रकल्पांपैकी आतापर्यंत ४५०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. रिच-१ मध्ये २७३६ व्या अखेरच्या सेगमेंटचे काम पूर्ण होणार असून उद्घाटन शुक्रवारी वर्धा रोडवरील जामठा कास्टिंग यार्डमध्ये महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांच्या हस्ते झाले.राष्ट्रीय महामार्ग व रेल्वेकरिता ३६१५ सेगमेंट तयारपत्रपरिषदेत दीक्षित म्हणाले, रिच-१ मध्ये व्हाय डक्टकरिता दोन पिलरमध्ये टाकण्यात येणारऱ्या अखेरच्या २७३६ व्या सेंगमेंट बनविण्याचे काम सुरू झाले. यार्डमध्ये आतापर्यंत राष्ट्रीय महामार्ग आणि मेट्रो रेल्वेकरिता ३६१५ सेगमेंट तयार झाले आहेत. एका सेगमेंटचे वजन ४५ टन, रुंदी ८.५ मीटर, लांबी तीन मीटर असून १०० वर्षांची गॅरंटी आहे. शहरातील महामेट्रोच्या कामात आतापर्यंत एकूण ६१,२२८ टन लोखंड आणि ५.३४,९७८ क्यु.मीटर कॉन्क्रिटचा उपयोग झाला आहे. एकूण १४०० पिलरपैकी १०८० पिलर उभे राहिले आहेत. याकरिता सुमारे १००० अभियंते आणि ६५०९ कामगार कार्यरत आहेत. याशिवाय २३ मोठ्या क्रेन, २७ छोट्या क्रेन, ४६ हॅड्रा आणि २३ लॉन्चिंग गर्डर कामाला आहेत. एक कि़मी. रेल्वे मार्ग उभारण्यासाठी ३६ कोटींची खर्च येत असल्याचे दीक्षित यांनी स्पष्ट केले.गड्डीगोदाम उड्डाण पुलाला एनएचएआय व रेल्वेची अद्याप परवानगी नाहीनागपूर मेट्रो रेल्वेच्या गड्डीगोदाम येथील उड्डाण पुलाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून अजूनही परवानगी आणि रेल्वेकडूनही मान्यता मिळाली नसल्यामुळे काम रखडले आहे. लवकरच मान्यता मिळाल्यास कामाला गती मिळेल. या ठिकाणचे भूमी अधिग्रहण हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा भाग आहे. नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक पूर्ण जमिनीचे अधिग्रहण झाले आहे. रिच-१ आणि रिच-३ मार्गावरील नऊ स्टेशनपैकी तीन स्टेशन पूर्ण झाले असून उर्वरित स्टेशनचे काम लवकरच पूर्ण होणार आहे.यावेळी महामेट्रोचे प्रकल्प संचालक महेशकुमार, रिच-१ चे कार्यकारी संचालक देवेंद्र रामटेककर, महासंचालक (प्रशासन) अनिल कोकाटे, मुख्य निवासी अभियंते ए.बी. गुप्ता आणि कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर