आरटीओला ४४१ कोटींचे उत्पन्न, गेल्यावर्षीच्या तुलनेत ३६.७९ कोटींचा अधिक महसूल
By सुमेध वाघमार | Updated: April 4, 2024 18:09 IST2024-04-04T18:04:12+5:302024-04-04T18:09:56+5:30
नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरच्या अखत्यारित असलेल्या तीन आरटीओ कार्यालयाने २०२३-२४ या आर्थिक वर्षात शासनाला ४४१ ...

आरटीओला ४४१ कोटींचे उत्पन्न, गेल्यावर्षीच्या तुलनेत ३६.७९ कोटींचा अधिक महसूल
नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरच्या अखत्यारित असलेल्या तीन आरटीओ कार्यालयाने २०२३-२४ या आर्थिक वर्षात शासनाला ४४१ कोटींचे उत्पन्न मिळवून दिले. शासनाने दिलेल्या लक्ष्याच्या तुलनेत १० टक्के महसूल कमी मिळाला असलातरी गेल्यावर्षीपेक्षा ३६.७९ कोटींची भर पडली आहे.
परिवहन विभागाने नागपूर शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयाला २०२३-२४ साठी १८३.५५ कोटी, पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी २४०.२९ कोटी, वर्धा कार्यालयासाठी ६९.२५ कोटी रुपयांच्या महसूलाचे लक्ष्य दिले होते. त्या तुलनेत नागपूर शहर कार्यालयाने १६९.७४ कोटी, पूर्व नागपूर आरटीओ कार्यालयाने २१४.५० कोटी, वर्धा आरटीओने ५७.३५ कोटी रुपये महसूल मिळवला. हा महसूल २०२२-२३ या वर्षातील नागपूर शहर आरटीओच्या १५३.९९ कोटी, पूर्व नागपूर १९७.२५ कोटी, वर्धा आरटीओच्या ५३.५६ कोटी रुपयांच्या महसूलाहून जास्त आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गिते व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भूयार यांच्या विशेष प्रयत्नामुळे दिलेल्या लक्ष्याच्या ९०टक्के महसूल गोळा करण्यात यश मिळाल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे.
-कार्यालयनिहाय महसूल (कोटींमध्ये)
कार्यालयाचे नाव २०२२- २३ २०२३- २४
शहर १५३.९९ १६९.७४
पूर्व नागपूर १९७.२५ २१४.५०
वर्धा ५३.५६ ५७.५६
एकूण ४०४.८० ४४१.५९
परिवहन आयुक्त, परिवहन सचिव यांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनामुळे महसूल वाढण्यास मदत झाली. यात कार्यालयातील सर्व अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक व कर्मचाºयांच्या प्रयत्नामुळे शहर, पूर्व व वर्धेतील आरटीओ कार्यालयांचा महसूल वाढला
-रवींद्र भुयार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी