अजनी सॅटेलाईट टर्मिनलसाठी ४.२६ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:54 IST2021-02-05T04:54:29+5:302021-02-05T04:54:29+5:30

नागपूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर ...

4.26 crore for Ajni Satellite Terminal | अजनी सॅटेलाईट टर्मिनलसाठी ४.२६ कोटी

अजनी सॅटेलाईट टर्मिनलसाठी ४.२६ कोटी

नागपूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला भरपूर निधी दिला आहे. यात नागपूर विभागातील रेल्वे प्रकल्पांसाठी पुरेसा निधी दिल्याचे पिंक बुकवरून स्पष्ट झाले आहे. अजनी सॅटेलाईट टर्मिनलसाठी ४.२६ कोटी रुपये देण्यात आले आहेत. अजनीत प्रगत इलेक्ट्रॉनिक प्रोद्योगिक संस्थेसाठी दोन कोटी रुपये, तसेच अजनीत इलेक्ट्रिक लोको मेन्टेनन्स डेपोसाठी ९७ लाख ६० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पात नागपूर रेल्वेस्थानकावर इटारसी एण्डकडील भागात प्लॅटफार्म क्रमांक १, २ आणि ३ ला सरळ करण्यासाठी १ कोटी ७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नागपूर रेल्वेस्थानकाच्या इटारसी एण्डकडील भागात प्लॅटफार्म क्रमांक १ ते ८ दरम्यान लिफ्टसह फूट ओव्हरब्रीज तयार करण्यासाठी सांकेतिक रूपाने १ हजार रुपये देण्यात आले आहेत. माजरी, गोधणी आणि खापरीच्या रेल्वे रुळावर ऑटोमॅटिक सिग्नल यंत्रणा लावण्यासाठी १० कोटी ३७ लाख रुपये देण्यात आले आहेत. अर्थसंकल्पात खापरी, गोधणी आणि माजरी रेल्वेस्थानकाला आदर्श रेल्वेस्थानक बनविण्यासाठी सांकेतिक रूपाने एक हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

...........

नागपूर-राजनांदगाव थर्ड लाईनला ४५० कोटी

अर्थसंकल्पात नागपूर-राजनांदगाव थर्डलाईनसाठी ४५० कोटी रुपये, छिंदवाडा-नागपूर ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी ४६ कोटी रुपये, कामठीत एक अतिरिक्त लूप लाईन, इतवारीत दोन अतिरिक्तलूप लाईन, कळमना गुड शेड लाईनसाठी प्रत्येकी एक हजार रुपये देण्यात आले आहेत. कळमना-इतवारी दरदम्यान क्रॉस ओव्हर, गोधणी-कळमना कॉर्डलाईन, तिगाव-चिचोंडा तिसऱ्या रेल्वे मार्गासाठीही भरपूर निधी देण्यात आला आहे. याशिवाय रेल्वे ओव्हरब्रीज, रेल्वे रुळाचे नूतनीकरण, प्रवासी सुविधा वाढविण्यासाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे.

ब्रॉडगेज कोच पीओएच शेडला निधी

मोतीबागमध्ये ब्रॉडगेज पिरियॉडिकल ओव्हरहॉलिंग शेडसाठी पाच कोटी रुपये देण्यात आले आहेत. या शेडमध्ये नॉन एसी कोचची देखभाल होणार आहे. त्याचप्रमाणे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत पाच आरपीएफ चौकी आणि महिलांसाठी चार बॅरेकसाठी ४.५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अजनी-नागपूर इंजिन लुपलाईनसाठी पाच लाख रुपये, तसेच मध्य रेल्वे नागपूर विभागातील रेल्वे क्वार्टरच्या विकासासाठी २० लाख रुपये देण्यात आले आहेत.

..............

Web Title: 4.26 crore for Ajni Satellite Terminal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.