४२३ पॉझिटिव्ह, ११ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:21 IST2021-01-08T04:21:50+5:302021-01-08T04:21:50+5:30
नागपूर : नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. मंगळवारी ४२३ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर ११ ...

४२३ पॉझिटिव्ह, ११ मृत्यू
नागपूर : नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. मंगळवारी ४२३ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर ११ मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या १२५७५५ झाली असून मृतांची संख्या ३९७६वर पोहचली. रुग्णसंख्या वाढत असताना चाचण्यांची संख्या आज पुन्हा ५ हजाराच्या खाली आली. दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत कमी, २९४ रुग्ण बरे झाले.
कोरोनाचा नव्या विषाणूचा प्रकारामुळे भीतीचे वातावरण वाढत असताना दुसरीकडे कोरोना रुग्णसंख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. यामुळे चिंतेचे वातावरण आहे. आज ४०४५ आरटीपीसीआर तर ६४८ रॅपिड अँटिजेन असे एकूण ४६९३ चाचण्या झाल्या. यातून पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहरातील ३८४, ग्रामीणमधील ३७ तर जिल्हाबाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील ६, ग्रामीणमधील ३ तर जिल्हाबाहेरील २ रुग्णांचे मृत्यू झाले. आतापर्यंत ११७६४५ रुग्ण बरे झाले आहेत. एकूण बाधितांच्या तुलनेत हे प्रमाण ९३.५५ टक्के आहे. ४१३४ रुग्ण उपचार घेत आहेत. यातील १३५० विविध रुग्णालयांमध्ये तर २७८४ गृह विलगीकरणात आहेत.
-६१ टक्के आरटीपीसीआर चाचण्या
मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भावाला सुरुवात होताच चाचण्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली. या १० महिन्याच्या कालावधीत आतापर्यंत एकूण ९५५०१० चाचण्या झाल्या. यात ५८९१०७ आरटीपीसीआर तर ३६५९०३ रॅपिड अँटिजेन चाचण्यांचा समावेश आहे. एकूण चाचण्यांच्या तुलनेत ६१ टक्के आरटीपीसीआर चाचण्या झाल्या आहेत.
-दैनिक संशयित : ४६९३
-बाधित रुग्ण : १२५७५५
_-बरे झालेले : ११७६४५
- उपचार घेत असलेले रुग्ण : ४१३४
- मृत्यू : ३९७६