Corona Virus; विदर्भात नव्या ४१ रुग्णांची नोंद; रुग्णसंख्या १२१६
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 21:06 IST2020-05-24T21:06:15+5:302020-05-24T21:06:35+5:30
विदर्भात उन्ह वाढत असताना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. रविवारी पुन्हा ४१ रुग्णांची भर पडली. एकूण रुग्णांची संख्या १२१६वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, आज पुन्हा अकोल्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद व एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Corona Virus; विदर्भात नव्या ४१ रुग्णांची नोंद; रुग्णसंख्या १२१६
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात उन्ह वाढत असताना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. रविवारी पुन्हा ४१ रुग्णांची भर पडली. एकूण रुग्णांची संख्या १२१६वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, आज पुन्हा अकोल्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद व एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. विदर्भात मृतांची संख्या ५१ झाली आहे. हॉटस्पॉट ठरलेल्या अकोला जिल्ह्यात १९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. या रुग्णांसह कोरोनाबाधितांची संख्या ३९७ वर पोहचली आहे. शिवाय, आज पुन्हा एका रुग्णाचा मृत्यू झाला. आतापर्यंत २४ मृत्यू झाले आहेत. यात एका रुग्णाची आत्महत्या आहे. या जिल्ह्याने मृताच्या संख्येत नागपुरला मागे टाकले आहे. आता रुग्णसंख्येतही मागे टाकते की काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपुरात सहा रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात एक महिला डॉक्टर असल्याने खळबळ उडाली. डॉक्टर पॉझिटिव्ह येण्याचे हे दुसरे प्रकरण आहे. या डॉक्टरची ड्युटी आमदार निवास या अलगीकरण कक्षात होती. परंतु १५ दिवसांपासून ती सुटीवर होती. दोन दिवसांपासून लक्षणे असल्याने शनिवारी तिने नमुने तपासणीसाठी दिले असता आज पॉझिटिव्ह अहवाल आला. या रुग्णासह मोमीनपुरा येथील दोन, गड्डीगोदाम येथील एक, जवाहरनगर येथील दोन असे सह रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या ४२३ झाली आहे. नागपुरात आतापर्यंत सातच मृत्यूची नोंद आहे. अकोल्यासोबतच अमरावती जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. १२ नव्या रुग्णांचे निदान झाले. रुग्णांची संख्या १६३ वर पोहचली आहे. भंडाऱ्यातही आणखी चार रुग्ण पॉझिटिव्ह आले. कोरोनाबाधितांची रुग्णांचा आलेख वाढत आहे. चार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यातील तीन जिल्हा बाहेरील असून एक जिल्ह्यातील आहे. रुग्णसंख्या १३वर पोहचली आहे.