चार हजारात खरेदी केलेल्या बालकामगाराची सुटका ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:09 IST2021-02-13T04:09:39+5:302021-02-13T04:09:39+5:30

नागपूर : काँग्रेसनगर परिसरातील एका डेअरी व्यवसायिकाच्या घरून महिला व बाल विभागाने एका बालकामगाराची सुटका केली. गुरुवारी सायंकाळी बालसंरक्षण ...

4,000 child laborers released () | चार हजारात खरेदी केलेल्या बालकामगाराची सुटका ()

चार हजारात खरेदी केलेल्या बालकामगाराची सुटका ()

नागपूर : काँग्रेसनगर परिसरातील एका डेअरी व्यवसायिकाच्या घरून महिला व बाल विभागाने एका बालकामगाराची सुटका केली. गुरुवारी सायंकाळी बालसंरक्षण विभाग आणि पाेलिसांच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाइ केली. पीडित बालक मूळचा राजस्थानच्या बारमुरा जिल्ह्यातील रहिवासी असून, चार हजार रुपये देऊन खरेदी करून आणल्याचे सांगण्यात येत आहे. ताे ११ वर्ष ६ महिन्यांचा आहे व त्याच्याकडून जनावरांचे शेण उचलणे, गाेठ्यात साफसफाई करण्याचे करून घेतले जात हाेते.

याबाबतची माहिती बालसंरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांना मिळाली. त्यांनी याबाबत जिल्हा महिला व बाल अधिकारी अपर्णा काेल्हे आणि कामगार विभाग यांना लिखित सूचना दिली. यानंतर जिल्हा संरक्षण कक्ष, कामगार विभाग आणि पाेलीस विभाग यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी ४ वाजता काॅंग्रेसनगरस्थित डेअरी व्यवसायी माणिकलाल जैन यांच्या घर आणि गाेठ्यात पाेहोचले. तेथे पीडित बालकाशी बाेलून त्याचे बयान नाेंदविण्यात आले. बालसंरक्षण अधिकारी पठाण यांच्यानुसार या मुलाला १५ दिवसांपूर्वी राजस्थानहून आणण्यात आले हाेते. मुलाला काम लावून देताे, असे सांगून आइला चार हजार रुपये देत त्याला नागपूरला आणले. त्यानंतर बालकाकडून गाेठ्यात काम करवले जात आहे. या प्रकरणात आराेपी जैन याच्याविराेधात बालकामगार कायदा व बाल न्याय अधिनियमाअंतर्गत धंताेली पाेलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईमध्ये अधिकारी पठाण, कामगार अधिकारी संजय धात्रक, लक्ष्मण राठोड, निशांत शिंगाडे, विनोद शेंडे, साधना हटवार, पूजा कांबळे, पीएसआई देवाजी नरवटे आदींचा सहभाग हाेता.

दाेन बालक आधीच पळाले

पीडित मुलाने दिलेल्या माहितीनुसार जैन याच्या गाेठ्यामध्ये यापूर्वी दाेन बालक काम करीत हाेते. मात्र काही दिवसांपूर्वी ते पळून गेल्याचे या मुलाने सांगितले.

Web Title: 4,000 child laborers released ()