शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

६ वर्षांत संघ शाखांमध्ये ४० टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 12:05 AM

संपूर्ण देशभरात संघशाखांचा विस्तार व्हावा यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सत्ताबदलानंतर तर संघाविषयी जनतेमध्ये आकर्षण जास्त प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. मागील ६ वर्षांमध्ये देशभरातील संघ शाखांमध्ये थोडीथोडकी नव्हे तर ४० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

ठळक मुद्देसंघ शाखांचे ‘अच्छे दिन’ : साप्ताहिक मिलनात ७५ टक्क्यांहून वाढ, ‘टेक्नोसॅव्ही’ तरुण जास्त जुळताहेत

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संपूर्ण देशभरात संघशाखांचा विस्तार व्हावा यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सत्ताबदलानंतर तर संघाविषयी जनतेमध्ये आकर्षण जास्त प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. मागील ६ वर्षांमध्ये देशभरातील संघ शाखांमध्ये थोडीथोडकी नव्हे तर ४० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. संघस्थानांची संख्यादेखील ३१ टक्क्यांहून अधिक वाढली आहे. विशेषत: ‘टेक्नोसॅव्ही’ तरुण वर्ग संघाकडे जास्त प्रमाणात वळत असल्याची माहिती संघ सूत्रांनी दिली आहे.२००६ पासून संघाने विस्तारावर अधिकाधिक भर देण्याची भूमिका घेतली. त्यानंतर संघ स्थान आणि शाखांची संख्या वाढीस लागावी यासाठी संघाकडून सातत्याने विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू झाले. २०१२ मध्ये देशभरात २७९७८ स्थानांवर संघ शाखांची संख्या ४०९८१ इतकी होती. त्यानंतर नागपुरात दोनदा अ.भा.प्रतिनिधी सभा झाल्या. २०१७ मध्ये ३६७२९ स्थानांवर संघ शाखांची संख्या ५७२३३ वर पोहोचली. या ६ वर्षांच्या कालावधीत देशभरात संघस्थानांमध्ये ८७५१ तर संघ शाखांमध्ये १६२५२ ने वाढ झाली.साप्ताहिक मिलनाकडे वाढता कलव्यावसायिक व नोकरदारांना अनेकदा कामामुळे दैनंदिन शाखेत जाणे शक्य होत नाही. त्यामुळे साप्ताहिक मिलनाच्या माध्यमातून संघाशी जुळून राहण्याकडे अनेकांचा कल दिसून येत आहे. २०१२ मध्ये देशभरात ८५०८ ठिकाणी साप्ताहिक मिलन व्हायचे. २०१७ मध्ये हाच आकडा १४८९६ वर पोहोचला. ६ वर्षांमध्ये साप्ताहिक मिलनांच्या संख्येत थोडीथोडकी नव्हे तर ७५ टक्क्यांनी वाढ झाली. यासोबतच संघ मंडळीच्या संख्येत १५ टक्क्यांची वाढ दिसून आली.असा झाला संघ शाखांचा विस्तारवर्ष          शाखा            साप्ताहिक मिलन२०१२    ४०,८९१           ८,५०८२०१३   ४२,९८१           ९,५५७२०१४   ४४,९८२          १०,१४६२०१५   ५१,३३०           १२,८४७२०१६   ५६,५६९          १३,७८४२०१७  ५७,२३३         १४,८९६९० टक्के शाखा युवकांच्याचवेगवेगळ्या वयोगटाचा विचार केल्यास शालेय ते महाविद्यालयीन विद्यार्थी व ४० वर्षाखालील लोकांच्या शाखांची टक्केवारी सुमारे ९० टक्के इतकी आहे. देशपातळीवर संघाकडून शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यादेखील शाखा लावण्यात येतात. नवीन गणवेशाच्या घोषणेनंतर विद्यार्थ्यांच्या शाखांमध्येदेखील वाढ झाली आहे. देशपातळीवर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सात हजारांहून अधिक शाखा लागतात. विशेषत: ‘टेक्नोसॅव्ही’ तरुण संघाकडे वळण्याचे प्रमाण वाढले आहे. २०१८ ची आकडेवारी आणखी वाढलेली आहे. तरुणांना आपल्या देशाची संस्कृती जाणून घ्यायची आहे. त्यांना मूळ संस्कारांचा गर्व आहे. त्यामुळे ते ‘जॉईन आरएसएस’, साप्ताहिक मिलन व शाखांच्या माध्यमातून संघाकडे वळत आहेत. अनेक तरुण समाजासाठी काहीतरी विधायक करू इच्छितात. संघातून त्यांना राष्ट्रकार्याची प्रेरणा मिळत असल्याने ते संघाशी जुळत आहेत, असे मत संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ.मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केले..

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर