अतिक्रमण कारवाईत ४ ट्रक साहित्य जप्त
By मंगेश व्यवहारे | Updated: April 29, 2024 22:13 IST2024-04-29T22:13:30+5:302024-04-29T22:13:39+5:30
तसेच वरच्या माळ्यावरील गॅलरीला लागून असलेली भिंत तोडण्यात आली.

अतिक्रमण कारवाईत ४ ट्रक साहित्य जप्त
नागपूर: म.न.पा. प्रवर्तन विभागामार्फत सोमवारी गांधीबाग झोनअंतर्गत अतिक्रमण पथकाद्वारे अहिराववाडा व गायत्री प्लाझा येथे अनधिकृत बांधकामाची कारवाई परत सुरू करण्यात आली. कारवाईत अनधिकृत पद्धतीने बांधण्यात आलेली पार्किंगच्या बाजुला लिफ्ट जवळील असलेली भिंत तोडण्यात आली. तसेच वरच्या माळ्यावरील गॅलरीला लागून असलेली भिंत तोडण्यात आली.
गॅलरीच्या भागाकडील साइडची भिंतही तोडण्यात आली. त्यानंतर नाल्याजवळील एमएसईबी विभागाच्या परिसरासमोरील इंदिरा गांधी झोपडपट्टी येथील अण्णा यांनी अवैधरीत्या फर्निचरचे दुकान थाटलेले होते. तिथे अवैधरीत्या बांधकाम करून राहत होते. त्यावरही कारवाई करून पूर्ण बांधकाम तोडण्यात आले. कारवाईतून ४ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.
कारवाई दरम्यान लोकांकडून खूप विरोध करण्यात आला. त्यानंतर ही पोलिसाची मदत घेऊन कारवाई पूर्ण करण्यात आली.
आशिनगर झोनअंतर्गत झोन कार्यालय ते इंदोरा चौक ते कमाल चौकपर्यंत कारवाई करण्यात आली. ज्यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फुटपाथवर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले.