शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात आता ४ नवे अपर जिल्हाधिकारी; प्रशासकीय कार्यक्षमतेत होणार वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 16:36 IST

Nagpur : राज्यातील प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने शासनाने महसूल विभागाचा नवा आकृतिबंध मंजूर केला असून, तब्बल ३५ हजार ८७६ पदांची निर्मिती करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने शासनाने महसूल विभागाचा नवा आकृतिबंध मंजूर केला असून, तब्बल ३५ हजार ८७६ पदांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये विदर्भाला आणखीन चार नवीन अपर जिल्हाधिकारी मिळणार आहेत. यामध्ये अमरावती, यवतमाळ, बुलडाणा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये प्रत्येक एक नवीन स्वतंत्र अप्पर जिल्हाधिकारी पद राहणार आहे.

नियोजन भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बावनकुळे यांनी विविध विषयांवर संवाद साधताना महसूल विभागातील मोठ्या प्रशासकीय बदलांची घोषणा केली. राज्यातील प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने शासनाने महसूल विभागाचा नवा आकृतिबंध मंजूर केला असून, तब्बल ३५,८७६ पदांची निर्मिती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महसूल विभागाचा शेवटचा आकृतिबंध २००६ मध्ये मंजूर झाला होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी नव्या आकृतिबंधासाठी अनेक आंदोलन केली होती. अखेर शासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे राज्यात ११ नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये, ८ नवीन उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालये, २ नवीन तहसीलदार कार्यालये आणि ६९ अप्पर तहसीलदार कार्यालये सुरू होणार आहेत. "विकास प्रक्रियेत प्रशासकीय सुधारणा अत्यंत महत्त्वाची असते आणि आम्ही ती करून दाखवली आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच यावर्षी सुमारे ७५० अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नव्या आकृतिबंधानुसार विदर्भाला ४ अतिरिक्त जिल्हाधिकारी पदाशिवाय ३० नवीन अप्पर तहसीलदार सुद्धा मिळणार आहेत. यामध्ये नागपूर विभागाला २०, तर अमरावती विभागाला १० नवीन अपर तहसीलदार मिळतील. 

विदर्भातील नवीन अप्पर तहसीलदार कार्यालय

अमरावती विभाग : अमरावती, अकोला, पुसद, उमरखेड, सिंदखेडराजा, मेहकर, खामगाव, वाशिम, रिसोड, कारंजानागपूर विभाग : नागपूर (ग्रामीण), हिंगणा, नागपूर (शहर), कामठी, सावनेर, काटोल, नरखेड, मौदा, कुही, हिंगणघाट, सेलू, पवनी, चार्मोशी, कुरखेडा, आरमोरी, धानोरा, सिरोंचा, एटापल्ली, अहेरी.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Vidarbha to get 4 new Additional Collectors, improving efficiency.

Web Summary : The government approved new posts in Vidarbha, including four Additional Collectors for Amravati, Yavatmal, Buldhana, and Nagpur, enhancing administrative efficiency. This decision follows the approval of 35,876 new positions in the revenue department, along with new sub-divisional and tehsil offices.
टॅग्स :Vidarbhaविदर्भnagpurनागपूर