शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

पूर्व विदर्भात डेंग्यूचे ३८८ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 8:03 PM

पावसाचा जोर कमी होताच डेंग्यू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जानेवारी ते आतापर्यंत ३८८ रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात असून रुग्णांची संख्या १८३ वर पोहचली आहे .

ठळक मुद्देनागपुरात १८३, चंद्रपुरात १७८ रुग्ण : भंडाऱ्यात एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पावसाचा जोर कमी होताच डेंग्यू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जानेवारी ते आतापर्यंत ३८८ रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात असून रुग्णांची संख्या १८३ वर पोहचली आहे तर दुसऱ्या क्रमांकावर चंद्रपूर जिल्हा आहे. येथे १७८ रुग्ण आहेत. या वर्षी पहिल्या डेंग्यू मृताची नोंद भंडाऱ्यात झाली आहे. विशेष म्हणजे, गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत एकही रुग्ण आढळून आलेला नाही.डेंग्यू हा विषाणूजन्य आजार आहे. ‘एडिस’ डासाच्या चावण्याने हा आजार होतो. डेंग्यूचा एक डास सुमारे १५०० डासाला जन्म घालतो. विशेष म्हणजे, दुसऱ्यांदा डेंग्यू झालेल्या रुग्णांमध्ये हा आजार जास्त गंभीर होतो. मात्र, जुन्या चुकांमधून धडा घ्यायला कुणीच तयार नाही. डेंग्यू डासांचा समूळ नाश करण्याची जबाबदारी सर्वांची असताना केवळ आरोग्य विभागावर जबाबदारी ढकलली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रशासनाकडे डासांशी मुकाबला करण्याची प्रभावशाली यंत्रणा नाही. त्यामुळे अत्यंत संवेदनशील व नाजूक आरोग्याच्या बाबतीत पूर्व विदर्भ डेंग्यूसारख्या धोक्याच्या मिठीत असल्याचे वास्तव आहे. नागपूर शहरात १५० रुग्णडेंग्यूसदृश तापाने उपराजधानी फणफणली आहे. यात डेंग्यू रुग्णांची संख्याही वाढत असल्याने लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. या वर्षात आतापर्यंत नागपूर शहरात १५० रुग्ण तर ग्रामीणमध्ये ३३ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या वर्षी २०१८ मध्ये ५४३ रुग्णांची नोंद झाली होती. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्याची स्थितीपूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यातील १६२० डेंग्यू संशयित रुग्णांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. यात ३८८ रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. यात नागपूर जिल्ह्यातील १८३, चंद्रपूर ग्रामीणमध्ये ९३ तर शहरात ८५ रुग्ण, वर्धा जिल्ह्यात १५, गोंदियात पाच रुग्ण तर भंडाऱ्यात सात रुग्ण व एका मृत्यूची नोंद झाली आहे. सहा जिल्ह्यातील चार वर्षातील आकडेवारीवर्षे      डेंग्यू रुग्ण         मृत्यू२०१६   २५२               १२०१७  ३२१                 ६२०१८  ११९०               ११२०१९  ३८८                 १जिल्हानिहाय डेंग्यूचे रुग्णजिल्हा रुग्णनागपूर १८३चंद्रपूर १७८भंडारा ७गोंदिया ५वर्धा १५

टॅग्स :dengueडेंग्यूVidarbhaविदर्भ