बँकेत शेतकऱ्याची ३५ हजाराने फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 00:19 IST2020-06-04T00:16:51+5:302020-06-04T00:19:13+5:30
बँकेत शेतकऱ्याची दिशाभूल करून ३५ हजाराने फसवणूक केली.

बँकेत शेतकऱ्याची ३५ हजाराने फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बँकेत शेतकऱ्याची दिशाभूल करून ३५ हजाराने फसवणूक केली. मनीषनगर येथील रहिवासी ६० वर्षीय नाना बेले हे शेतकरी आहेत. त्यांची मुलगी दुबई येथे राहते. तिला पैशाची गरज असल्याने बेले मुलीच्या खात्यात एक लाख रुपये जमा करण्यासाठी बुधवारी सकाळी आयुर्वेद ले-आऊट, उमरेड रोडवरील एसबीआय बँकेत आले होते. बँकेत एका अज्ञात आरोपीने बेले यांना एक लाख रुपये मोजून देतो, असे सांगितले. त्याने पैसे मोजून देण्याचे नाटक करून ३५ हजार रुपये त्यातून उडविले व ६५ हजार रुपये बेले यांना देऊन तो फरार झाला. बेले यांना आपल्याला फसविल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सक्करदरा पोलीस ठाण्यात तक्रार केली. आरोपी हा बँकेच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. परंतु मास्क लावून असल्याने तो ओळखू आला नाही.