शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

नागपुरात ३५० विद्युत कर्मचारी सामूहिक सुटीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2020 8:25 PM

Agitation, mahavitaran, employee, Nagpur news आपल्या घर-प्रतिष्ठानातील विद्युत वाहिनीत तांत्रिक अडचणीमुळे वीज बाधित झाली तर तो पुरवठा नियमित होण्यास बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. महावितरणमध्ये आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून काम करत असलेले ३५० कर्मचारी शुक्रवारी दुपारी ४ वाजतापासून सामूहिक सुटीवर गेल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देतांत्रिक अडचणीच्या क्षणी वीजपुरवठा कठीणएसएनडीएलमधून आलेल्या कर्मचाऱ्यांना हटवल्याची नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या घर-प्रतिष्ठानातील विद्युत वाहिनीत तांत्रिक अडचणीमुळे वीज बाधित झाली तर तो पुरवठा नियमित होण्यास बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. महावितरणमध्ये आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून काम करत असलेले ३५० कर्मचारी शुक्रवारी दुपारी ४ वाजतापासून सामूहिक सुटीवर गेल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे हे सर्व कर्मचारी एसएनडीएलमधून महावितरणमध्ये आले आहेत. यातील ४० कर्मचाऱ्यांना काढल्याने इतर कर्मचाऱ्यांनी सामूहिक सुटीचे अस्त्र उपसले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांअभावी तांत्रिक अडचण उद्भवल्यास विजेचा पुरवठा नियमित करण्यास महावितरणला अतिशय कठीण जाणार आहे.गेल्याच वर्षी सप्टेंबरमध्ये एसएनडीएलकडून महावितरणने शहरातील महाल, गांधीबाग व सिव्हिल लाईन्स या विभागाचे कामकाज आपल्या हाती घेतले होते. मात्र, एसएनडीएलचे आॅपरेटर्स व लाईनमन्सला आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून कायम ठेवण्यात आले होते. आता त्यांच्या जागी एक-एक करत महावितरणच्या स्थायी कर्मचाऱ्यांना नियुक्त केले जात आहे. याच धोरणामुळे आतापर्यंत एसएनडीएलचे जवळपास ४० आॅपरेटर्स व लाईनमन्स काढण्यात आले आहेत. महावितरणच्या याच धोरणाचा निषेध एसएनडीएलच्या कर्मचाऱ्यांनी काढला आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या बॅनरखाली सर्व कर्मचाºयांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंता यांना पत्र पाठवून शुक्रवारी दुपारी ४ वाजतापासून सामूहिक रजेवर जात असल्याची माहिती दिली. झोन सचिव नितीन शेंदरे यांना सादर केलेल्या पत्राच्या अनुषंगाने शहरातील वीज संकट दूर करण्यासाठी या कर्मचाºयांना महावितरणमध्ये समाविष्ट करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांना काढून महावितरणने या कर्मचाऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे. याबाबत कर्मचाऱ्यांनी राज्याचे ऊर्जामंत्री व मुख्य अभियंत्यांना अनेक पत्र लिहिले आहेत. मात्र, त्याकडे सारासार दुर्लक्ष केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी लावला आहे. हे कर्मचारी बऱ्याच वर्षांपासून शहरातील सबस्टेशन्ससोबतच वितरण प्रणाली सांभाळत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने आॅपरेटर्स व लाईनमन एकसाथ रजेवर गेल्याने वीज वितरण प्रणाली धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.समस्या निर्माण होणार नाही - महावितरणकंपनी नागरिकांना कोणतीच समस्या निर्माण होऊ देणार नाही, असे वक्तव्य महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले. फिल्डवर कंपनीचे २०० ऑपरेटर्स, लाईनमन तैनात असून, अन्य कर्मचारीही त्यांना सहकार्य करतील. अशा स्थितीत मानवबळाची कोणतीच समस्या उत्पन्न होणार नसल्याचे दोडके यांनी म्हटले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणEmployeeकर्मचारी