शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

नागपुरात साडेतीन कोटींची लॉटरी लागल्याची बतावणी; औषध व्यावसायिकाला नऊ लाखांचा चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 10:09 AM

साडेतीन कोटींची लॉटरी लागल्याची बतावणी करून येथील एका औषध व्यावसायिकाला दोन आरोपींनी ८ लाख, ९१ हजारांचा गंडा घातला. कोतवाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देकोतवालीत गुन्हा दाखल

आॅनलाईन लोकमतनागपूर : साडेतीन कोटींची लॉटरी लागल्याची बतावणी करून येथील एका औषध व्यावसायिकाला दोन आरोपींनी ८ लाख, ९१ हजारांचा गंडा घातला. कोतवाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.हेमंत प्रभाकर मेंढे (वय ४२) असे फसगत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते औषधांचा (मेडिसिन) व्यवसाय करतात. २५ नोव्हेंबरला दुपारी १ वाजता त्यांना एक फोन आला. आधी जेम्स मॉरगन आणि नंतर मोनिका नामक महिला पलीकडून बोलली. चेव्हरेट क्रूड आॅटो कंपनीतून बोलतो, असे सांगून आरोपींनी मेंढे यांचे आधी अभिनंदन केले. तुम्हाला ३ कोटी ६० लाख रुपयांची लॉटरी लागली आहे, असे आरोपींनी सांगितले. ही रक्कम तुमच्यापर्यंत कशी पाठवायची, अशी विचारणा करीत आरोपींनी मेंढेंकडून वेगवेगळी माहिती काढून घेतली. त्यानंतर त्यांना २९ नोव्हेंबरपर्यंत ई मेल पाठवून वेगवेगळ्या नावाखाली ८ लाख, ९१ हजार, ५०० रुपये बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. प्रत्येक वेळी काही न काही कारण सांगून बँक खात्यात रक्कम जमा करण्यास बाध्य करणाऱ्या आरोपींचा संशय आल्यानंतर मेंढे यांनी आरोपींकडे लॉटरीच्या रकमेबाबत विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. नंतर आरोपींनी प्रतिसाद देणे बंद केल्यामुळे मेंढे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदवली. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा