नागपुरात कायदा मोडणाऱ्या ३४८ व्यक्ती पोलिसांकडून डिटेन: आयुक्त मुंढे यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 23:09 IST2020-03-21T23:08:05+5:302020-03-21T23:09:19+5:30
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात कलम १४४ लागू करून जमावबंदी जारी केली आहे. हा कायदा मोडणाऱ्या ३४८ व्यक्तींना शहरात डिटेन केले असून दुकाने सुरू ठेवणाऱ्या ५३ दुकानदारांवर कारवाई केली असल्याची माहिती महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.

नागपुरात कायदा मोडणाऱ्या ३४८ व्यक्ती पोलिसांकडून डिटेन: आयुक्त मुंढे यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात कलम १४४ लागू करून जमावबंदी जारी केली आहे. हा कायदा मोडणाऱ्या ३४८ व्यक्तींना शहरात डिटेन केले असून दुकाने सुरू ठेवणाऱ्या ५३ दुकानदारांवर कारवाई केली असल्याची माहिती महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.
आयुक्त कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुंढे म्हणाले, जमावबंदी काळात लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले केले आहे. नागरिकांनी अनावश्यक रोडवर येऊ नये. महत्वाचे काम असेल तरच, त्याचा विचार या कायात केला जाईल. नागरिक या आवाहनाला चांगली साथ देत आहेत. नागपुरातील ९० टक्के लोक आज रोडवर नाहीत. प्रवासासाठी रेल्वे, बस, ऑटो सुविधा अद्यापही सुरू आहेत. मात्र अशातही कायदा मोडणाऱ्या ३४८ लोकांना डिटेक्ट केले आहे. ता सर्वांना दोन ते तीन तास थांबवून ठेवले. ६८ अॅक्टप्रमाणे कारवाई करून नंतर सोडण्यात आले. या काळात दुकाने सुरू ठेवणाºया ५३ दुकानदारांवरही कलम १८८ नुसार शनिवारी कारवाई करण्यात आल्याचे मुंढे यांनी सांगितले. शहरातील ९८ टक्के लोक सहकार्य करीत आहे. अनावश्यक कुणी बाहेर पडत असतील, तर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
मनीषनगरातील ‘त्या’ व्यक्तीची दखल
बजाजजनगर, मनिषनगर परिसरात संशयीय रूग्ण असलेल्यापैकी एक व्यक्ती सर्रासपणे फिरत असून जनतेत मिसळतो. त्यामुळे नागरिक धास्तावल्याचे यावेळी पत्रकारांनी पालकमंत्री आणि आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. त्या संदर्भातील कारवाईची माहिती देताना मुंढे म्हणाले, आमचे अधिकारी आणि डॉक्टर्स अशा दोन व्यक्तीपर्यंत गेले होते. त्यापैकी एकाला यापूर्वी कॉरेन्टाईन केले होते. मात्र तो प्रवासी प्रशासनाला सहकार्य करत नव्हता. दोघांपैकी एकाला पोलिसांच्या माध्यमातून ताब्यात घेऊन कॉरेन्टाईन केले आहे. आज सकाळी दुसऱ्याला होम कॉरेन्टाईन केले आहे. प्रशासनाचे लक्ष नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. संबंधिताला यापूर्वीच होम कॉरेन्टाईन केले होते. परंतु त्याने सूचना पाळल्या नाही. ती तक्रार आमच्यापर्यंत आल्यावर दखल घेतली. जनतेला आम्ही हेल्प लाईनचा नंबर दिला आहे. परिसरात कोणी संशयीत असतील, घराबाहेर पडत असतील, तर कळवा.