कोरोनाच्या ३३९ नव्या रुग्णांची भर, ३६० बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:21 IST2021-01-13T04:21:54+5:302021-01-13T04:21:54+5:30

नागपूर : मागील आठ दिवसानंतर पहिल्यांदाच दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या ४०० च्या खाली आली. मंगळवारी ३३९ नव्या बाधितांची भर पडली, ...

339 new corona patients added, 360 cured | कोरोनाच्या ३३९ नव्या रुग्णांची भर, ३६० बरे

कोरोनाच्या ३३९ नव्या रुग्णांची भर, ३६० बरे

नागपूर : मागील आठ दिवसानंतर पहिल्यांदाच दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या ४०० च्या खाली आली. मंगळवारी ३३९ नव्या बाधितांची भर पडली, तर ८ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांची एकूण संख्या १,२८,७५८ झाली असून, मृतांची संख्या ४,०३५ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, नव्या रुग्णांच्या तुलनेत अधिक, ३६० रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण ९३.३५ टक्के झाले आहे.

नागपूर जिल्ह्यात आज ४,४६२ कोरोना संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात ३,६७० आरटीपीसीआर तर ७९२ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांचा समावेश होता. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३०५ तर ॲन्टिजेनमध्ये २४ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची नोंद झाली. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहरातील २६४, ग्रामीणमधील ७३ तर जिल्हाबाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे. एम्सच्या प्रयोगशाळेतून ४९, मेडिकलच्या प्रयोगशाळेतून ४८, मेयोच्या प्रयोगशाळेतून ५२, नीरीच्या प्रयोगशाळेतून ३७, नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतून ३६, खासगी लॅबमधून ९३ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

- कोरोनाच्या गंभीर रुग्णांमध्ये वाढ

मेयो, मेडिकलमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. धक्कादायक म्हणजे, दोन्ही रुग्णालयांमध्ये गंभीर रुग्णांची संख्या अधिक आहे. नागपूर जिल्ह्यात १३३२ रुग्ण भरती आहेत. यातील एकट्या मेडिकलमध्ये १८४, मेयोमध्ये ७९, एम्समध्ये ५० रुग्ण आहेत. मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयाच्या कोविड हेल्थ सेंटरमध्ये १७, मनपाच्या आयसोलेशनमध्ये ११ तर लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये १८ रुग्ण उपचार घेत आहेत. उर्वरित रुग्ण विविध खासगी रुग्णालयात उपचाराखाली आहेत. ३,२०१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

- ब्रिटनमधील संशयित रुग्ण गेले घरी

मेडिकलच्या विशेष वॉर्डात भरती असलेल्या ब्रिटनमधील तीन संशयित रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत आठ रुग्णांना सुटी देण्यात असून तूर्तास एकही रुग्ण दाखल नाही. विशेष म्हणजे, आज सुटी देण्यात आलेल्या तिन्ही संशयितांचा नमुन्यांचा अहवाल पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. परंतु १४ दिवस होऊनही निकाल प्राप्त झाला नाही. यामुळे मेडिकल प्रशासनाने तिन्ही रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी केली. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सुटी देण्यात आली.

- दैनिक संशयित : ४,४६२

- बाधित रुग्ण : १,२८,७५८

- बरे झालेले : १,२०,१९०

- उपचार घेत असलेले रुग्ण : ४,१३४

- मृत्यू : ४,५३३

Web Title: 339 new corona patients added, 360 cured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.