शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

३३ एसीएफ झाले डीएफओ

By admin | Updated: April 8, 2016 03:02 IST

राज्य शासनाने वन विभागातील ३३ सहायक वनसंरक्षक, गट-अ (कनिष्ठ श्रेणी) अधिकाऱ्यांना विभागीय वन अधिकारी म्हणून पदोन्नती देऊन त्यांच्या नवीन पदस्थापनेचा आदेश जारी केला आहे.

काळे यांची प्राणिसंग्रहालय प्राधिकरणावर वर्णी नागपूर : राज्य शासनाने वन विभागातील ३३ सहायक वनसंरक्षक, गट-अ (कनिष्ठ श्रेणी) अधिकाऱ्यांना विभागीय वन अधिकारी म्हणून पदोन्नती देऊन त्यांच्या नवीन पदस्थापनेचा आदेश जारी केला आहे. विशेष म्हणजे, यात नागपुरातील १२ वन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मागील २३ फेब्रुवारी २०१६ रोजी झालेल्या विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीत या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. त्यावर अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) यांनी राज्य शासनाकडे या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार राज्याच्या महसूल व वन विभागाने हे पदोन्नती आदेश जारी केले आहेत. पदोन्नती देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये नागपुरातील नंदकिशोर व्यंकटेश काळे यांना महाराष्ट्र प्राणी संग्रहालय प्राधिकरण, नागपूर येथे विभागीय वन अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र प्राणी संग्रहालय प्राधिकरण, नागपूर येथील ही पहिलीच नियुक्ती आहे. तसेच उत्तम सावंत यांची नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र येथे उपसंचालक म्हणून, संतोष सस्ते यांची सामाजिक वनीकरण-वर्धा येथे उपसंचालकपदी , सचिन रेपाळ यांची गोरेवाडा प्रकल्प, येथे विभागीय व्यवस्थापक म्हणून, विजय खेडकर यांची विभागीय वन अधिकारी (मूल्यांकन), चंद्रपूर, नीता ढेरे यांची विभागीय वन अधिकारी (रोहयो), नागपूर, मनीषा पाटील यांची विभागीय वन अधिकारी (तेंदू) येथे, योगेश वाघाये यांची विभागीय वन अधिकारी (योजना) चंदपूर येथे, दीपक खाडे यांची ताडोबा-अंधारी येथे, प्रशांत खाडे यांची विभागीय वन अधिकारी (तेंदू) गडचिरोली येथे, पी. ए. डोंगरे यांची विभागीय वन अधिकारी (वनसंपत्ती संवर्धन),गडचिरोली येथे व एस.एफ. पावरा यांची विभागीय वन अधिकारी (तेंदू), नागपूर येथे पदस्थापना करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)