देशभरातून निघाला ३२,९९६.४ टन बायोमेडिकल कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 10:41 AM2021-07-09T10:41:28+5:302021-07-09T10:44:16+5:30

कोविड-१९ संक्रमणादरम्यान २०२० या वर्षात जून ते डिसेंबर या काळात देशभरात जवळपास ३२,९९६.४ टन बायोमेडिकल कचरा निघाला. सर्वाधिक ५,५९७ टन कचरा ऑक्टोबर महिन्यात निघाला.

32,996.4 tons of biomedical waste was dumped across the country | देशभरातून निघाला ३२,९९६.४ टन बायोमेडिकल कचरा

देशभरातून निघाला ३२,९९६.४ टन बायोमेडिकल कचरा

Next
ठळक मुद्दे- बायोमेडिकल कचरा ठेवण्यात निष्काळजीपणा दाखविल्यास हेपेटायटिस, एड्स आणि टीबीसारखे गंभीर आजार होऊ शकतात. - साधारण कचरा संक्रमित बायोमेडिकल कचऱ्यापासून दूर ठेवण्याची गरज आहे. याचे मिश्रण संक्रमण पसरविणारे आजार आणि महामारीच्या प्रसाराला वाव देणारे ठरू शकते.मागील वर्षात सात महिन्यात महाराष्ट्र, केेरळ आणि गुजरातची स्थिती सर्वाधिक वाईट

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोविड-१९ संक्रमणादरम्यान २०२० या वर्षात जून ते डिसेंबर या काळात देशभरात जवळपास ३२,९९६.४ टन बायोमेडिकल कचरा निघाला. सर्वाधिक ५,५९७ टन कचरा ऑक्टोबर महिन्यात निघाला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या माहितीनुसार, बायोमेडिकल कचरा निघण्याच्या बाबतीत महाराष्ट्राची स्थिती सर्वात वाईट होती. जून २०० ते डिसेंबर २०२० पर्यंत महाराष्ट्रात जवळपास ५,३६९.२५४ टन बायोमेडिकल कचरा निघाला. तो अन्य राज्यांच्या तुलनेत बराच अधिक होता. निव्वळ ऑगस्ट-२०२० या एकाच महिन्यात महाराष्ट्रात निघालेला १,३५९ टन बायोमेडिकल कचरा हा एक प्रकारचा रेकॉर्डच होता. विशेषज्ज्ञांच्या मते, कोरोना संक्रमणाची दुसरी लाट आल्यानंतर बायोमेडिकल कचऱ्यामध्ये वाढ होत आहे.

सीपीसीबीच्या आकडेवारीनुसार या वर्षी एप्रिल महिन्यात संपूर्ण देशात दररोज १३९ टन बायोमेडिकल कचरा निघाला. तर, मे पर्यंत दररोज २०३ टन कचरा निघाला. सीपीसीबीला राज्यांकडून मिळालेल्या आकडेवारीवर नजर टाकली असता, महाराष्ट्रानंतर सर्वाधिक बायोमेडिकल कचरा निर्माण करणाऱ्या राज्यांमध्ये केरळ, गुजरात, तामिळनाडु, उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, कर्नाटक, आंध्र प्रदेश, हरियाणा, मघ्य प्रदेश, ओडिशा यांचा समावेश आहे.

कोरोना संक्रमणादरम्यान महिनेवार निघालेला सरासरी बायोमेडिकल कचरा (टन प्रति दिन)

सीपीसीबीला राज्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशात सद्यस्थितीत सुमारे १९८ कॉमन बायोमेडिकल ट्रीटमेंट फॅसिलिटीज आहेत. येथे बायोमेडिकल कचरा नष्ट केला जात आहे.

 

Web Title: 32,996.4 tons of biomedical waste was dumped across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.