३२२ नवीन पॉझिटिव्ह, ६ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:57 IST2021-02-05T04:57:01+5:302021-02-05T04:57:01+5:30
नागपूर : जिल्ह्यात रविवारी एकूण ४३३८ नमुने तपासण्यात आले. यापैकी ३२२ नमुने (७.४२ टक्के) पॉझिटिव्ह आले. गेल्या २४ ...

३२२ नवीन पॉझिटिव्ह, ६ जणांचा मृत्यू
नागपूर : जिल्ह्यात रविवारी एकूण ४३३८ नमुने तपासण्यात आले. यापैकी ३२२ नमुने (७.४२ टक्के) पॉझिटिव्ह आले. गेल्या २४ तासांत काेरोनाने सहा जणांचा मृत्यू झाला, तर ३१७ रुग्ण बरे होऊ घरी परतले. आतापर्यंत एकूण १ लाख २४ हजार ७८७ रुग्ण बरे होऊ घरी परतले आहेत. रिकव्हरी रेट ९४.२० टक्के इतका आहे.
नवीन पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये शहरातील २५३, ग्रामीणमधील ६६ आणि जिल्ह्याबाहेरचे ३ जण आहेत. मृतांमध्ये शहरातील एक, ग्रामीणमधील दोन व जिल्ह्याबाहेरचे तीन आहेत. नागपुरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १,३२,४६६ इतकी झाली आहे, तर एकूण मृत्यू ४१२७ इतके झाले आहेत. रविवारी तपासण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये शहरातील ३८०७ आणि ग्रामीणमधील ५३१ आहेत. आतापर्यंत एकूण १० लाख ३४ हजार १९३ नमुने तपासण्यात आले आहेत. रविवारी बरे झालेल्या रुग्णांमध्ये शहरातील २७२ आणि ग्रामीणमधील ४५ आहेत.
गेल्या २४ तासांत खासगी प्रयोगशाळेत ९०, ॲँटिजेन टेस्टमध्ये ४४, एम्सच्या प्रयोगशाळेत २८, मेडिकलच्या प्रयोगशाळेत ४०, मेयोच्या प्रयोगशाळेत ४३, माफसूच्या प्रयोगशाळेत ४०, नीरीच्या प्रयोगशाळेत १५ आणि नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत २२ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले.
ॲक्टिव्ह - ३५५२
बरे झालेले- १,२४,७८७
मृत - ४१२७