लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी भाजप व काँग्रेस बंडखोरांस एकूण ३०२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहे. आता निवडणुकीच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी गुरुवारी केवळ १२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होते. मात्र, आज शेवटच्या दिवशी तब्बल २९० उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणातील चित्र स्पष्ट झाले आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराज भाजपच्या अनेक माजी नगरसेवकांनी उमेदवारी दाखल केली होती. यात काही काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचाही समावेश होता. परंतु भाजपचे काही नाराज अजूनही मैदानात असल्याने लढतीतील रंगत वाढली आहे. नागपुरात अतीतटीची निवड होणार असून कुणीही बिनविरोध निवडून आले नाही. त्यामुळे सर्वच प्रभागात लढती रंगतदार असणार आहेत.
झोननिहाय आकडेवारी पाहता लकडगंज झोनमध्ये सर्वाधिक ४३ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यानंतर मंगळवारी झोनमध्ये ३७, सतरंजीपुरा झोनमध्ये ३५, तर धंतोली आणि नेहरूनगर झोनमध्ये प्रत्येकी ३३ उमेदवारांनी माघार घेतली आहे. गांधीबाग महाल झोनमध्ये ३०, हनुमानगर झोनमध्ये २८, आसीनगर झोनमध्ये २७, धरमपेठ झोनमध्ये २४, तर लक्ष्मीनगर झोनमध्ये १२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. या माघारीमुळे अनेक प्रभागांतील उमेदवारांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.
Web Summary : 302 candidates withdrew from Nagpur Municipal Corporation elections, including BJP and Congress rebels. No uncontested wins occurred, ensuring competitive races in all wards. Zone-wise, Lakadganj saw the most withdrawals.
Web Summary : नागपुर नगर निगम चुनाव से भाजपा और कांग्रेस के बागियों सहित 302 उम्मीदवारों ने नाम वापस लिए। कोई निर्विरोध जीत नहीं हुई, जिससे सभी वार्डों में प्रतिस्पर्धी दौड़ सुनिश्चित हुई। ज़ोन के अनुसार, लकड़गंज में सबसे अधिक नाम वापस लिए गए।