शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

३० हजार कि.मी.चे रस्ते लवकरच पक्के होणार : गृहमंत्री अनिल देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 22:06 IST

शहरी वाहतूक व्यवस्थेच्या सुविधेसोबतच ग्रामीण क्षेत्रातील दळणवळण सुविधा उच्च दर्जाची करण्यासाठी लवकरच ग्रामीण क्षेत्रातील ३० हजार किलोमीटरचे रस्ते पूर्ण करणार, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कनरखेड/नागपूर : शहरी वाहतूक व्यवस्थेच्या सुविधेसोबतच ग्रामीण क्षेत्रातील दळणवळण सुविधा उच्च दर्जाची करण्यासाठी लवकरच ग्रामीण क्षेत्रातील ३० हजार किलोमीटरचे रस्ते पूर्ण करणार, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सन २०२० मधील नरखेड तालुक्यातील खापरी केने येथील रस्त्यांच्या कामांचे लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम शनिवारी गृहमंत्री अनिल देशमुख तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती नरखेडच्या सभापती नीलिमा रेवतकर, उपसभापती वैभव दळवी, जिल्हा परिषद सदस्या पूनम जोध, नरखेड पंचायत समिती सदस्या माया मोढोरिया, खापरी केने ग्रामपंचायतच्या सरपंच अश्विनी केने, उपसरपंच नेत्राम सोनेकर यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, अधीक्षक अभियंता एन. एस. अन्सारी, कार्यकारी अभियंता नीता ठाकरे, उपअभियंता राजेंद्र जैन आदी उपस्थित होते.ग्रामपंचायतीच्या सहकायार्तून येत्या काळामध्ये ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासोबतच उच्च दर्जाच्या दळणवळण सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येईल, असे आश्वासनही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी दिले. गृहमंत्री देशमुख म्हणाले, राज्यात लवकरच ८ हजार पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. बेरोजगारांनी या संधीचा फायदा घ्यावा. तसेच अवैध सावकारीला चाप लावण्यासाठी याबाबत अडचणी असल्यास थेट माझ्याजवळ तक्रार नोंदवावी, असे आवाहनही केले.ग्रामीण भागाच्या विकासासाठी सर्वंकष प्रयत्न : हसन मुश्रीफराज्यातील न जोडलेल्या वाड्या-वस्त्या जोडण्यासाठी तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या परंतु दुरवस्था झालेल्या रस्त्यांचा दर्जा वाढविण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ही ग्रामविकास विभागाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. ग्रामीण क्षेत्राचा आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावण्यासोबतच ग्रामीण क्षेत्रातील दळणवळण व्यवस्था उच्च दर्जाची करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात येत आहेत. येत्या कालावधीत ग्रामीण क्षेत्रात ३० हजार कि. मी. चे रस्ते लवकरच बांधण्यात येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखnagpurनागपूर