शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

पेटलेल्या मराठा आंदोलनात 'लालपरी' ठरली 'सॉफ्ट टार्गेट'; ८५ गाड्या फोडल्या, ३ बसेस पेटविल्या

By नरेश डोंगरे | Updated: October 30, 2023 22:12 IST

विविध भागातील मार्गावर लागला ब्रेक : लाखोंचे नुकसान

नागपूर : राज्यातील अनेक भागात पेटलेल्या मराठा आंदोलनाची तीव्र झळ राज्य परिवहन महामंडळाला बसली आहे. चार दिवसांत राज्यात ३ एसटी बसेस जाळण्यात आल्या असून ८५ गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. जाळपोळ, तोडफोडीतून होणारे प्रचंड नुकसान आणि आंदोलनाचा जागोजागी ब्रेकर (अडथळा) लागल्याने एसटी महामंडळाला रोज लाखोंचा फटका बसत आहे. परिणामी एसटी महामंडळांत तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.

आरक्षणाची मागणी पूर्ण व्हावी यासाठी आंदोलक आक्रमक झाल्याने मराठा आंदोलन दिवसेंदिवस उग्र होत आहे. परिणामी राज्याच्या विविध भागात रास्ता रोको, तोडफोड, जाळपोळीच्या घटना घडत आहेत. कुण्या एखाद-दुसऱ्या गावाकडे नव्हे तर राज्याच्या अनेक भागात हे लोण पसरले असून आंदोलकांसाठी एसटी महामंडळाची 'लालपरी सॉफ्ट टार्गेट' ठरली आहे. विविध पक्षाच्या नेत्यांसोबतच आंदोलक त्यांचा राग 'वड्याचे तेल वांग्यावर' या उक्तीप्रमाणे एसटीच्या लालपरीवर काढत आहेत.

केवळ चार दिवसांत राज्यात ३ बसेस पेटविण्यात आल्या असून ८५ गाड्या फोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे महामंडळाला चांगलीच धडकी भरली आहे. एकीकडे जाळपोळ तोडफोडीमुळे प्रचंड नुकसान होत आहे. तर, दुसरीकडे आंदोलनाचा अडथळा पार करता येत नसल्याने विविध मार्गाने धावणाऱ्या अनेक गाड्या जागच्या जागी अडून पडल्या आहेत. परिणामी ठिकठिकाणच्या फेऱ्यांवर विपरीत परिणाम होऊन एसटीला रोज लाखोंच्या उत्पन्नापासून मुकावे लागत आहे.

विदर्भातील वऱ्हाडात कोंडी;नागपूर-विदर्भात आंदोलनामुळे वऱ्हाडाकडील भाग एसटीची कोंडी करणारा ठरला आहे. यवतमाळ मार्गे धावणाऱ्या पंढरपूर - नागपूर, सोलापूर - नागपूर आणि परतीच्या मार्गावरील बसेसपैकी काही बसेस पुसद, उमरखेड, अंबेजोगाई आदी ठिकाणी अडून उभ्या आहेत. तर, अमरावती मार्गे धावणाऱ्या नागपूर ते पूणे चिखलीपर्यंत आणि नागपूर ते छत्रपती संभाजीनगर ही बसअकोल्यापर्यंतचा प्रवास करून अडकून पडली आहे.

७७०९ किलोमिटरच्या २२ फेऱ्या प्रभावितअधिकाऱ्यांच्या मते विदर्भातील ७७०९ किलोमिटरच्या मार्गावर धावणाऱ्या २२ फेऱ्यांना आंदोलनाचा जबर फटका बसला आहे. बसेसचे संचालन बंद पडल्याने एसटीला रोज लाखोंचा फटका बसत आहे.

आर्थिक कोंडीची भीतीहे आंदोलन आणखी किती दिवस चालेल, याचा नेम नाही. मात्र, अशीच स्थिती आणखी काही दिवस राहिल्यास एसटी पुन्हा आर्थिक कोंडीत सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही चांगलीच धडकी भरली आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारfireआग