शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

नागपुरात जप्त केलेली 3 कोटींची 'ती' रोकड हवालाची ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 17:03 IST

पोलिसांनी मध्यरात्री सापळा रचून रोकड घेऊन जाणारी गाडी पकडली

नागपूर : नंदनवन पोलिसांनी रविवारी मध्यरात्री २.३० च्या सुमारास एका डस्टर कारमधून ३ कोटी २२ लाखांची रोकड जप्त केली. रायपूरहून (छत्तीसगड) एका सराफा व्यावसायिकानं ही रोकड नागपुरातील व्यावसायिकासाठी पाठवली होती. ही रोकड हवालाची असावी, असा संशय आहे. एमएच ३१/ एफए ४६११ क्रमांकाच्या डस्टर कारमधून हवालाची कोट्यवधींची रोकड छत्तीसगडमधून नागपुरात येत असल्याची माहिती नंदनवन पोलिसांना मिळाली. त्यावरून रात्रपाळीत असलेले एपीआय सोनवणे आणि पीएसआय सोनुले यांनी पारडी मार्गावरील प्रजापती चौकात सापळा लावून या कारला थांबवले. कारमध्ये राजेश वामनराव मेंढे (वय ४०, रा. मिनीमातानगर, कळमना) आणि नवनीत गुलाबचंद जैन (वय २९ रा. शांतीनगर, तुलसीनगर जैन मंदीराजवळ) हे दोघे होते. आम्ही कारचे चालक आहोत आणि ही कार वर्धमाननगरातील प्रशांत केसानी नामक व्यापाऱ्याकडे घेऊन जात असल्याचं त्यांनी सांगितलं. पोलिसांनी केसानीला फोन लावून कारमध्ये काय आहे, अशी विचारणा करुन त्याला नंदनवन पोलीस ठाण्यात येण्यास सांगितलं. मात्र, केसानीनं पोलिसांशी बोलणं टाळण्याचा प्रयत्न केला. खबऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी कारची कसून तपासणी केली असता डिक्की आणि चारही सीटच्या पायदानाजवळ विशिष्ट कप्पे (लॉकर) तयार करण्यात आल्याचं पोलिसांना दिसले. ते कुलूपबंद होते. त्यामुळे पोलिसांनी वाहनचालक मेंढे आणि जैनला चावी मागितली असता, त्यांनी ती केसानीकडे असल्याचे सांगितले. केसानी प्रतिसाद देत नव्हता. नंतर त्याच्या वतीनं मनिष खंडेलवाल पोलीस ठाण्यात आला. बरेच आढेवेढे घेतल्यानंतर त्याने नंतर सकाळी ७ वाजता लॉकरची चावी उपलब्ध करून दिली. पोलिसांनी लॉकर उघडले असता आतमध्ये २ हजार, ५००, २०० आणि शंभरच्या नोटांची बंडलं दिसली. पोलिसांनी पंचासमक्ष ही रोकड बाहेर काढली. परिमंडळ चारचे उपायुक्त निलेश भरणे यांना ही माहिती कळताच त्यांनी लगेच नंदनवन पोलीस ठाणे गाठलं. त्यांनी पंच आणि व्हिडीओ कॅमेरे बोलवून ही रक्कम मोजून घेतली. त्यासाठी नोटा मोजण्याच्या मशिन्सही मागवण्यात आल्या. या गाडीत एकूण ३ कोटी २२ लाख ७२० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आयटी, इडीला माहितीपोलीस उपायुक्त भरणे यांनी लगेच प्राप्तिकर विभाग आणि अंमलबजावणी संचलनालयाला याबद्दलची माहिती देऊन दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलवून घेतलं. दरम्यान, ही रोकड मॅपल ज्वेलरी प्रा. लि. रायपूरचे संचालक खजान ठक्कर यांनी रायपुरातून नागपुरात पाठविल्याची प्राथमिक माहिती पुढे आली. प्रशांत केसानी काय करतो, ते स्पष्ट झाले नाही. मात्र, ही रोकड हवालाचीच असावी, अशी जोरदार चर्चा शहरात पसरली होती. 

टॅग्स :nagpurनागपूरPoliceपोलिस