दहावीत २९.५२ टक्के, बारावीत १८.६३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 21:53 IST2020-12-23T21:51:15+5:302020-12-23T21:53:51+5:30

Supplimentry Exam result दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचे निकाल घोषित झाले आहे. नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल २९.५२ टक्के तर बारावीचा निकाल १८.६३ टक्के लागला आहे.

29.52 per cent students passed 10th and 18.63 per cent students passed 12th | दहावीत २९.५२ टक्के, बारावीत १८.६३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

दहावीत २९.५२ टक्के, बारावीत १८.६३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

ठळक मुद्देपुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचे निकाल घोषित झाले आहे. नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल २९.५२ टक्के तर बारावीचा निकाल १८.६३ टक्के लागला आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेद्वारे पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. नोव्हेंबर- डिसेंबर २०२० या कालावधीत पार पडलेल्या दहावीच्या परीक्षेत नागपूर बोर्डातून ३७६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील ११११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी २९.५२ आहे. तर बारावीच्या परीक्षेत नागपूर बोर्डातून ५७१६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यातील १०६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाली. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी १८.६३ टक्के आहे. दहावीच्या परीक्षेत नागपूर बोर्डाचा राज्यातून सर्वात कमी निकाल लागला आहे. तर बारावीच्या परीक्षेत नागपूर बोर्ड चौथ्या क्रमांकावर आहे. यंदा कोरोनामुळे पुरवणी परीक्षा उशिरा घेण्यात आल्या तरी निकाल अवघ्या १४ दिवसात घोषित करण्यात आला आहे.

Web Title: 29.52 per cent students passed 10th and 18.63 per cent students passed 12th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.