शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

२९ एक्साईज एसपींना नियुक्त्या

By admin | Updated: June 16, 2014 01:04 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (एक्साईज) अधीक्षक व उपअधीक्षकांना अखेर शासनाने नियुक्त्या दिल्या असून त्यांचे सहा महिन्यांपेक्षा अधिक काळाचे थकीत वेतन देण्याचे आदेशही जारी केले आहेत.

सहा महिन्यांची प्रतीक्षा संपली : मंत्र्यांचे विधान परिषदेत उत्तर
यवतमाळ : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (एक्साईज) अधीक्षक व उपअधीक्षकांना अखेर शासनाने नियुक्त्या दिल्या असून त्यांचे सहा महिन्यांपेक्षा अधिक काळाचे थकीत वेतन देण्याचे आदेशही जारी केले आहेत.
‘लोकमत’ वृत्ताची दखल घेऊन विधान परिषद सदस्य धनंजय मुंडे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक यांनी उपरोक्त माहिती दिली. राज्य लोकसेवा आयोगामार्फत उत्पादन शुल्क खात्यात २९ अधीक्षक व उपअधीक्षक दाखल झाले होते. त्यांचा परिविक्षाधीन कार्यकाळ सप्टेंबर २०१३ मध्ये संपला. मात्र त्यानंतरही तब्बल सहा महिने त्यांना पूर्णवेळ नियुक्त्या दिल्या गेल्या नाही. हेतुपुरस्सर प्रतीक्षा यादीत ठेवले गेले. कायम नियुक्त्या न मिळाल्याने सहा महिने त्यांना वेतनही दिले गेले नाही. पर्यायाने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली.
सातारा जिल्ह्याच्या फलटन येथील अमर काटे या उपअधीक्षकाचा वेतनाच्या प्रतीक्षेत वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी १४ जानेवारी २०१४ रोजी हृदयाघाताने मृत्यू झाला.
उत्पादन शुल्क खात्याच्या एसपींची व्यथा मांडणारे वृत्त ‘लोकमत’ने ८ मार्च २०१२ रोजी प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत आमदार धनंजय मुंडे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. सभागृहात कार्यपूर्तीचे उत्तर देता यावे म्हणून त्यापूर्वीच एक्साईजच्या अधीक्षक, उपअधीक्षकांना कायम नियुक्त्या दिल्या गेल्या.
शिवाय उत्पादन शुल्क आयुक्तांना थकीत वेतन देण्याचे आदेश जारी करण्यात आले. यावर ‘लोकमत’मुळे न्याय मिळाल्याची भावना अनेक एसपींनी व्यक्त केली. (जिल्हा प्रतिनिधी)