नागपुरात मास्क न लावणाऱ्या २७६ नागरिकांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 23:30 IST2020-10-13T23:28:36+5:302020-10-13T23:30:55+5:30
Unwearied mask action, NMC महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी मंगळवारी मास्क शिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार २७६ नागरिकांविरुध्द कारवाई केली . त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष ३८ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी ११,९१२ नागरिकांविरुध्द कारवाई करुन ४३ लाख १५ हजारांचा दंड वसूल केला आहे.

नागपुरात मास्क न लावणाऱ्या २७६ नागरिकांना दंड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी मंगळवारी मास्क शिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार २७६ नागरिकांविरुध्द कारवाई केली . त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष ३८ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी ११,९१२ नागरिकांविरुध्द कारवाई करुन ४३ लाख १५ हजारांचा दंड वसूल केला आहे.
लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ५२, धरमपेठ ८२, हनुमाननगर २८, धंतोली ११, नेहरुनगर १५, गांधीबाग १८, सतरंजीपूरा १७, लकडगंज १३, आशीनगर १८, मंगळवारी १९ आणि मनपा मुख्यालयात ३ जणांविरुध्द ही कारवाई करण्यात आली. शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात आतापर्यंत ६४४२ बेजबाबदार नागरिकांकडून ३२ लाख २१ हजार वसूल करण्यात आले आहे.
नागपूरात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे तसेच मृतांची संख्या पण वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी महापालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज सर्व झोनमधील मास्क शिवाय फिरणाऱ्या नागरिकांविरुध्द कारवाई करत आहे.