अकरावीच्या २७ हजार जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:07 IST2021-01-09T04:07:30+5:302021-01-09T04:07:30+5:30

नागपूर : नागपूर महापालिकेच्या हद्दीत अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश पद्धतीने राबविण्यात आली. आतापर्यंत झालेल्या तीन फेऱ्या, विशेष फेरीअंती ...

27,000 seats are vacant | अकरावीच्या २७ हजार जागा रिक्त

अकरावीच्या २७ हजार जागा रिक्त

नागपूर : नागपूर महापालिकेच्या हद्दीत अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश पद्धतीने राबविण्यात आली. आतापर्यंत झालेल्या तीन फेऱ्या, विशेष फेरीअंती २७,०१२ जागा रिक्त राहिल्या आहेत.

महापालिकेच्या हद्दीतील २१६ ज्युनिअर कॉलेजमध्ये ५९,२५० अकरावीच्या जागा होत्या. आतापर्यंत झालेल्या सर्व फेऱ्याअंती ३२,२३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. सर्वाधिक १७,६३६ विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतले. तर सर्वात कमी प्रवेश एमसीव्हीसी शाखेत झाले. अकरावीच्या पहिल्या फेरीत १३,१४६ प्रवेश झाले. दुसऱ्या फेरीत ६,८९५ तिसऱ्या फेरीत २,०५०, विशेष फेरीत ६,५०० विद्यार्थ्यानी प्रवेश घेतले. गेल्यावर्षी रिक्त जागांचा आकडा २१ हजार होता. यंदा त्यात वाढ झाली आहे. अकरावीच्या एवढ्या मोठ्या संख्येने जागा रिक्त राहिल्याने शिक्षकांची चिंता वाढली आहे. सातत्याने अकरावीच्या जागा रिक्त राहत असल्याने शिक्षण विभागाने केंद्रीय प्रवेश पद्धत बंद करून, प्रवेश प्रक्रिया मुख्याध्यापकांच्या अधिकारात राबविण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

- शाखेनिहाय रिक्त जागांची संख्या

शाखा जागा प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या रिक्त जागा

कला ९६६० ३५३१ ६१२९

वाणिज्य १८००० ९३२५ ८६७५

विज्ञान २७४६० १७६३६ ९८२४

एमसीव्हीसी ४१३० १७४६ २३८४

Web Title: 27,000 seats are vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.