शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांसाठी २५ लाखांचा आमदार निधी वापरू द्यावा : नितीन राऊत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 00:05 IST

गरिबांना मदत करता यावी यासाठी २५ लाखांचा निधी आमदार निधीतून वापरण्याची आमदारांना परवानगी द्यावी, अशी मागणी ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली आहे.

ठळक मुद्देशिधापत्रिका नसलेल्यांनादेखील अन्नधान्य वाटप व्हावे

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’ संकटामुळे गरीब जनतेचे हाल होत आहेत. शिधापत्रिकाधारकांना तर रेशन दुकानातून धान्य पुरवठा व्हायलाच हवा. मात्र ज्यांच्याकडे काही कारणांमुळे शिधापत्रिका नसेल त्यांनादेखील या आपात्कालीन परिस्थितीत अन्नधान्य देणे गरजेचे आहे. गरिबांना मदत करता यावी यासाठी २५ लाखांचा निधीआमदारनिधीतून वापरण्याची आमदारांना परवानगी द्यावी, अशी मागणी ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गुरुवारी पत्रदेखील लिहिले.राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत समाविष्ट न झालेले दारिद्र्य रेषेवरील शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानातून धान्य पुरवठा करण्यात यावा. तसेच झोपडपट्टीत राहणारे, सायकलरिक्षा चालक, ऑटोचालक, चहाटपरी चालक, पानठेला चालक, बुटपॉलिश करणारे, विटभट्टी कामगार, औद्योगिक मजूर, निराधार यांच्यापैकी अनेकांकडे शिधापत्रिका नाहीत. त्यांच्याकडे शिधापत्रिका नसल्याने सवलतीच्या दरात तसेच मोफत धान्य वितरणाचा लाभ त्यांना घेता येणार नाही. हे लोक प्रचंड अडचणीत आहेत. अनेक जण नागपूर शहर सोडून गावांकडे स्थलांतरित होत आहेत. यासंदर्भात सर्वच पक्षाच्या आमदार व लोकप्रतिनिधींनी माझ्याकडे भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांना देखील आपात्कालीन स्थितीत अन्नधान्य पुरविले पाहिजे, अशी मागणी नितीन राऊत यांनी केली.यावर उपाय म्हणून आमदार निधीतून तात्काळ आमदारांना किमान २५ लाख रुपयांचा निधी वापरण्याची परवानगी देण्यात यावी. यासंबंधात शासनाने लगेच धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती राऊत यांनी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.केबल शुल्क विलंबाने घ्यावे‘लॉकडाऊन’ कालावधीत केबल टीव्हीचालकांनी ग्राहकांकडून मासिक शुल्क एक महिना विलंबाने वसूल करावे. तसेच या काळात कुठलेही ‘कनेक्शन’ खंडित करू नये, अशी मागणीदेखील पालकमंत्र्यांनी केली.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतMLAआमदारfundsनिधी