शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरच्या मेयो, मेडिकलमध्ये २४ तासांत २४ मृत्यू; अधिकारी म्हणतात..

By सुमेध वाघमार | Updated: October 4, 2023 13:17 IST

या दोन्ही रुग्णालयाला हाफकिन महामंडळाकडून दोन वर्षांपासून औषधी मिळालेल्या नाहीत. स्थानिक पातळीवर औषधी खरेदी करून रोजचा दिवस ढकलण्याची वेळ

नागपूर : नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यूने इतरही शासकीय रुग्णालयांतील रुग्णांच्या मृत्यूचा आकडांचा खेळ सुरू झाला आहे. नागपूरच्या मेयो, मेडिकलमध्येही मागील २४ तासांत २४ मृत्यूने बुधवारी लक्ष वेधले. परंतु या दोन्ही रुग्णालयातील रुग्णांची संख्या पाहता हा सामान्य आकडा असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.   मेयो, मेडिकलमध्ये विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रदेशातून रुग्ण येतात. या दोन्ही रुग्णालयाची रोजची ओपीडी तीन ते चार हजारांच्या घरात असते. तर आंतररुग्ण विभागात रोज ३०० ते ४०० रुग्ण उपचारासाठी येतात. मागील ४० वर्षांत दोन्ही रुग्णालयातील रुग्णांची संख्या चार पटीने वाढल्या असल्यातरी मनुष्यबळापासून ते सोयी उपलब्ध करून देण्याकडे सरकारचे फारसे लक्ष नाही. या दोन्ही रुग्णालयाला हाफकिन महामंडळाकडून दोन वर्षांपासून औषधी मिळालेल्या नाहीत. स्थानिक पातळीवर औषधी खरेदी करून रोजचा दिवस ढकलण्याची वेळ आली आहे. मेयोमध्ये तर स्थानिक पातळीवर औषधी खरेदी करण्यात आलेली ३० टक्क्यांची मर्यादाही संपली आहे. यामुळे औषधांचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. असेच मेडिकल प्रशासनाचे आहे. औषधांचा तुटवड्यामुळे रुग्ण व नातेवाईकांचा रोषाला डॉक्टरांना समोर जावे लागत आहे.

- मेडिकलमध्ये १५ मृत्यू

मागील २४ तासांत मेडिकलमध्ये १५ मृत्यू झाले. तर ४८ तासांत ३१ मृत्यूची नोंद आहे. यात तीन लहान मुले असल्याचे मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार यांनी सांगितले. ते म्हणाले, रुग्णालयात रोज जवळपास १० ते १५ मृत्यू होतात. या मागील महत्त्वाचे कारण म्हणजे, यातील ८० टक्के रुग्ण खासगी हॉस्पिटलमधून रेफर होऊन आलेले असतात. हे सर्व रुग्ण अति गंभीर, आजाराची गुंतागुंत वाढलेली असल्याने उपचारादरम्यान मृत्यूचा धोका सर्वाधिक असतो.

- मेयोमध्ये ९ मृत्यू

मेयोच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. राधा मुंजे यांनी सांगितले, मागील २४ तासांत ९ मृत्यू झाले आहेत. यात लहान मुले नाहीत. मेयोमध्ये रोज सहा ते आठ मृत्यू होतात. ही संख्या सामान्य असल्याचे त्या म्हणाल्या.

टॅग्स :Healthआरोग्यGovernment Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयhospitalहॉस्पिटलDeathमृत्यूnagpurनागपूर