शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

विदर्भातील २.४८ लाख घरकुलांना मिळाले प्रकाशाचे ‘सौभाग्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 9:00 PM

‘प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजना’ अर्थातच ‘सौभाग्य’ योजने अंतर्गत महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रात १०० टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले असून या योजनेत विदर्भातील सर्वच २ लाख ४८ हजार ८७० घरकुलांना वीजजोडणी देण्यात आली आहे. यात सर्वाधिक ४२ हजार ७१३ वीजजोडण्या नागपूर जिल्ह्यात तर त्याखालोखाल ३५ हजार ७९२ वीजजोडण्या अतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्यात देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यात ४२ हजारवर लाभार्थी : गडचिरोली ३५ हजारावर घरकुलांना जोडणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजना’ अर्थातच ‘सौभाग्य’ योजने अंतर्गत महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रात १०० टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले असून या योजनेत विदर्भातील सर्वच २ लाख ४८ हजार ८७० घरकुलांना वीजजोडणी देण्यात आली आहे. यात सर्वाधिक ४२ हजार ७१३ वीजजोडण्या नागपूर जिल्ह्यात तर त्याखालोखाल ३५ हजार ७९२ वीजजोडण्या अतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्यात देण्यात आल्या आहेत.२०११ च्या सामाजिक, आर्थिक जातीच्या जनगणनेच्या आधारे विदर्भात एकूण ५७ लाख १९ हजार ३३८२ घरकुले होती, त्यापैकी १० आॅक्टोबर २०१७ पर्यंत ५४ लाख ८७ हजार ६३३ घरकुलांचे विद्युतीकरण पूर्ण झाले होते तर २ लाख ३१ हजार ७४९ घरकुले विजेपासून वंचित होती. विजेपासून वंचित नागरिकांना २४ तास वीज पुरवठा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना ‘सौभाग्य’ या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ २५ सप्टेंबर २०१७ रोजी दिल्ली येथे केला होता तर महाराष्ट्रात या योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ २३ डिसेंबर २०१७ रोजी नागपूर येथे करण्यात आला होता.लाभार्थी कुटुंबांची पात्रता २०११ च्या सामाजिक, आर्थिक जातीच्या जनगणनेच्या आधारे निश्चित करण्यात आली. या अनुषंगाने विजेपासून वंचित असलेल्या विदर्भातील सर्वच २ लाख ३१ हजार ७४९ लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात येऊन त्यापुढे जात ‘सौभाग्य रथ’ मोहिमे अंतर्गत महावितरणने फेब्रुवारी २०१९ च्या अखेरपर्यंत १७ हजार १२१ नवीन घरकुलांना वीजजोडणी दिल्याने या योजनेतील लाभार्थ्यांचा आकडा २ लाख ४८ हजार ८७० पर्यंत नेत १०० टक्के विद्युतीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. या योजनेच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील विद्युतीकरण न झालेल्या प्रत्येक घरकुलाला वीज जोडणी दिली गेल्याने रोजगारांच्या संधीत वाढ होऊन स्त्रियांच्या दैनंदिन जीवनमानात सुधारणांचे नवीन दालन उघडले आहे.गरिबांना मोफत, तर इतरांकडून केवळ ५०० रुपये शुल्कसौभाग्य योजनेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थ्यांना वीजजोडणी विनाशुल्क तर इतर लाभार्थ्यांना मात्र ५०० रुपये शुल्क आकारण्यात आले. हे ५०० रुपये संबंधित लाभार्थ्यांकडून त्याच्या बिलातून १० टप्प्यात वसूल करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरातील अंतर्गत वायरिंगसह एक चार्जिंग पॉईंट, एक एलईडी दिवा मोफत देण्यात आला. तसेच ज्या ठिकाणी पारंपरिक विद्युतीकरण करणे शक्य नाही, अशा अतिदुर्गम भागातील घरांना सौरऊर्जा संचामार्फत वीजपुरवठा देण्यात आला आहे. या ठिकाणी अंतर्गत वायरिंगसह एक डीसी पंखा, पाच एलईडी दिवे आणि एक डीसी चार्जिंग पॉईंट मोफत देण्यात आला आहे. पंतप्रधान आवास योजना, शबरी योजना, रमाई योजना, आदिम योजना व इतर योजनेतून तयार झालेल्या घरांनासुध्दा मोफत वीजपुरवठा देण्यात आला आहे.

 

टॅग्स :electricityवीजVidarbhaविदर्भ