शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
3
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
4
"मराठी 'not welcome' म्हणणार्‍यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
5
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
6
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
7
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
8
भन्साळींच्या 'हीरामंडी'त चुकाच चुका! सोनाक्षीच्या हातातील पेपरमध्ये 'कोरोनाच्या बातम्या'
9
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
10
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
11
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
12
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
13
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
14
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
15
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
16
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
17
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
18
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
19
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
20
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?

नागपूर जिल्हा परिषदेच्या २४७ शाळा अप्रगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 10:26 PM

जिल्ह्यातील शिक्षणाच्या अवस्थेवर स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी चांगलेच ताशेरे ओढले. शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरणांतर्गत जिल्ह्यात २४७ शाळा अप्रगत असल्याचे शिक्षण विभागाने मान्य केले. शैक्षणिक वर्ष संपत असताना २५ टक्के विद्यार्थी गणवेशापासून वंचित असल्यावर सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

ठळक मुद्देअजूनही २५ टक्के विद्यार्थी गणवेशाविना

ऑनलाईन लोकमत

नागपूर : जिल्ह्यातील शिक्षणाच्या अवस्थेवर स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी चांगलेच ताशेरे ओढले. शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरणांतर्गत जिल्ह्यात २४७ शाळा अप्रगत असल्याचे शिक्षण विभागाने मान्य केले. शैक्षणिक वर्ष संपत असताना २५ टक्के विद्यार्थी गणवेशापासून वंचित असल्यावर सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. या बैठकीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ५० हजार रुपये नुकसान भरपायी देण्याची मागणी सदस्यांनी केली.जि.प. अध्यक्ष निशा सावरकर यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत विरोधी पक्ष नेते मनोहर कुंभारे यांनी शिक्षणाच्या अवस्थेवर आक्षेप घेतला. जि.प.च्या शाळा डिजिटल झाल्याचे शिक्षणाधिकारी म्हणत असले तरी, शिक्षकच डिजिटल नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शाळांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी लावलेले आॅरो बंद आहे. अनेक शाळांची वीज कापण्यात आली आहे. तालुकास्तरावरील शिक्षणाधिकाऱ्यांचे जि.प. शाळांकडे दुर्लक्ष आहे. खाजगी शाळांमध्ये हे शिक्षणाधिकारी भेटी देतात. मात्र जि.प.च्या शाळांकडे दुर्लक्ष करतात. विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाही. सायकलीच्या डीबीटी न झाल्याने विद्यार्थ्यांना सायकली मिळाल्या नाही, अशी सर्वांगीण नाराजी सदस्यांनी बैठकीत व्यक्त केली. बैठकीत पशुसंवर्धन विभागाचे ग्रामीण भागात राहणाºया ३९ कर्मचाºयांचा तसेच आरोग्य विभागाच्या १२३ कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता थांबविल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जामठा ग्रामपंचायतीची २००७ पासून चौकशी करण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले. बैठकीला उपाध्यक्ष शरद डोणेकर, सभापती उकेश चव्हाण, दीपक गेडाम, आशा गायकवाड, पुष्पा वाघाडे, वर्षा धोपटे, नाना कंभाले, संध्या गोतमारे, उज्वला बोढारे, रुपराव शिंगणे, विजय देशमुख, सीईओ डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त सीईओ अंकुश केदार उपस्थित होते. बोंडअळीमुळे शेतकरी अडचणीतकापसाच्या पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. कृषी विभागाने गेल्या आठ दिवसांपासून सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांनी कापूस घेतल्यानंतर पऱ्हाट्या उपटून टाकल्या आहे. कळमेश्वर तालुक्यात २२७०० हेक्टरवर कापूस पेरण्यात आला आहे. परंतु सर्वेक्षणाच्या अहवालात केवळ २०० हेक्टर दाखविण्यात आले आहे. कृषी विभागाने सरसकट सर्वेक्षण करून, शेतकऱ्याला हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी विरोधी सदस्यांनी केली आहे. यावर अध्यक्ष निशा सावरकर यांनी नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे निर्देश दिले.२२५ बोअरवले प्रलंबितजिल्ह्यात १००० बोअरवेलला मंजुरी दिली होती. केसींग पाईप संपल्यामुळे जिल्ह्यात ७७५ बोअर झाल्या. पाईप पुरवठादार कंपनीने थकीत बिलापोटी केसींग पाईपचा पुरवठा बंद केल्याने २२५ बोअरवेल रखडल्या असल्याचा आरोप कुंभारे यांनी केला. रुरल अर्बन क्षेत्र विकास मिशनमध्ये राजकारणकेंद्र सरकार पुरस्कृत असलेल्या रुरल अर्बन क्षेत्र विकास मिशन योजनेत २०१७-१८ साठी जिल्ह्यात हिंगणा तालुक्याची निवड झाली आहे. याचे केंद्र हिंगण्यातील कान्होलीबारा असून, तेथून २५ किलोमीटरच्या आतची गावे यात निवडायची आहे. परंतु बीडीओ व डीआरडीएच्या अधिकाऱ्यांनी राजकीय दबावापोटी केवळ भाजपाचे सरपंच असलेल्या गावांचीच निवड केली असल्याचा आरोप जि.प. सदस्य उज्ज्वला बोढारे यांनी केला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेत विहिरीचा कोटा वाढवून देण्याची मागणी केली. तसेच डेग्मा खुर्द गावात प्रशासन कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करीत असल्याचा आरोप केला.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाnagpurनागपूर